गडचिरोली नगर परिषद सभापती निवडणूकीत भाजपाचा ‘वरचष्मा ’ * राष्ट्रवादी कॉंग्रेसला (अजीत पवार) सत्तेत वाटा, चार सभापतींची बिनविरोध निवड * महिला बालकल्याण सभापतीपदासाठी झाली निवडणूक

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- स्थानिक नगर परिदेषच्या विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी 21 जानेवारी रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. चार सभापतींची बिनविरोध निवड झाली, तर महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. चार सभापती पदांपैंकी बांधकाम, आरोग्य व स्वच्छता आणि शिक्षण असे तीन भाजपाला, तर पाणीपुरवठा सभापतीपद राष्ट्रवादी कॉंग्रेला देण्यात आले.
उपविभागीय अधिकारी तथा पिठासान अधिकारी अरूण एम व मुख्याधिकारी सुर्यकांत पिदूरकर यांच्या उपस्थितीत विशेश बैठक पार पडली. भाजपाचे मुक्तेश्वर काटवे यांची आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती, अनिल कुनघाडकर यांची बांधकाम, हर्शल गेडाम यांची शिक्षण सभापतीपदी, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लिलाधर भरडकर यांची पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्ष निखिल चरडे यांना वित व नियोजन समितीचे सभापतीपद देण्यात आले. नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर स्थायी समितीच्या पदचिघ्द अध्यक्ष असतील.
भाजपाकडे बहुमत असतांनाही महिला व बालकल्याण सभापती व उपसभापतीपदासाठी निवडणूक झाली. भाजपाकडून सिमा कन्न्मवासर यांनी , तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या मनिशा खेवले यांनी अर्ज दाखल केला. उपसभापतीपदासाठी भाजपाच्या शिल्पा गव्हारे यांनी अर्ज भरला , तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या मेघा वरगंटीवार रिंगणात होत्या. मात्र भाजपाच्या सिमा कन्न्मवार निवडून आल्या. तर उपसभापती भाजपच्या शिल्पा गव्हारे झाल्या. सर्व सभापतींचे आ.डॉ. मिलींद नरोटे, माजी आ. डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, राकॉंचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, सागर निंबोरकर यांनी अभिनंदन केले.