जिल्हा

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या;  * गडचिरोली टायगर ग्रुपची मागणी, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांना दिले निवेदन

AVB NEWS  गडचिरोली :- जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहरातील चंद्रपूर मार्गावरील महिला महाविद्यालयाकडे जाणाऱ्या चौकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा आणि चौकाच्या सौदर्याकरणसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी टागयर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष दिपक भारसागडे व टागयर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. या मागणीच्या अनुशंगाने नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांना निवेदन देण्यात आले.

टायगर ग्रुपने नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांना दिलेल्या निवेदनात स्प्ष्ट केले आहे की, गडचिरोली शहरात मुलभूत सोयीसुविधा निर्माण केल्या जात आहेत. शहरातील युवकांसाठी उर्जास्त्रोत असलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा मिळावी या हेतूने शहरातील चंद्रपूर मार्गावरील महिला महाविद्यालयाकडे जाणाऱ्या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची भावना तरूणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे टायगर ग्रुपमापर्फत शिवाजी महाराजांच्या पुतळण्याची प्रतिश्ठापण करण्याची तयारी आहे. परंतू पुतळा उभारण्यासाठी जागेची समस्या आहे.

त्यामुळे नगरविकास विभागाच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देणे व चौकाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी 1 कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी टायगर ग्रुपचे दीपक भारसागडे, रक्षीत पांटवार, सलमान शेख, अंकूश कुडावले, अरबाज शेख, तुशार मडावी, अविनाश कायरकर, सागर भांडेकर, प्रथमेश कुरणकर, त्रशीकेश बारापात्रे, इमरान शेख, पुरब शिल, सार्थक खांडरे, धिरज रोहनकर, नावेद शेख, आकाश भरडकर, शिवम बारड, कल्पक मुपीडवार, अंकुश नैताम, अनुज तलांडे,दुर्गेश गौतम, सुमित फुलझेले, हरिश बोमनपल्लीवार, संजोग बोबाटे, हर्श बावणे, सुमित भोयर, हर्श बावणे, रोहीत नैताम, श्लोक चापडे, मिथून पुडके, अमित चापडे, आशिश दंडीकवार, मधूर हेमके, सुरज चन्नावार, तेजस रायसिडाम, क्रिश कोतपल्लीवार,, प्रथमेश येनप्रेडीवार, अक्षय काटवले, राहुल जिवतोडे, नितेश खडसे यांनी केली आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.