जिल्हा

महिलांनी समाजघडणीत सक्रिय भूमिका बजावावी :- नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांचे प्रतिपादन *** भाजपा महिला मोर्चातर्फे हळदीकुंकू व स्नेहमिलन कार्यक्रम  

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- महिलांनी समाजघडणीत सक्रिय भूमिका बजावावी असे प्रतिपादन नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी केले. महिलांना एकत्र आणून सामाजिक सलोखा, स्नेहभावना व संघटन बळकटी साधण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकर यांनी आपल्या भाषणातून महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत, महिलांनी समाजघडणीत सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन केले.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, गडचिरोली यांच्या वतीने महिलांसाठी आयोजित हळदीकुंकू व स्नेहमिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात डी.एस.आर. हॉल येथे पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकर व नगर उपाध्यक्ष निखिल चरडे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या वेळी प्रमुख उपस्थितीत  माजी नगराध्यक्ष तथा भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष  योगिता पिपरे  डॉ. चंदा कोरवते, रंजना कोडाप, रेखा डोळस, नगरसेविका वर्षा शेडमाके, नगरसेविका सीमा कन्नमवार, नगरसेविका भारती खोब्रागडे,नगरसेविका गुड्डी मारभते, नगरसेविका कोमल नैताम,नगरसेविका शिल्पा गव्हारे,नगरसेविका अर्चना निंबोड,नगरसेविका साक्षी बोलूवार यांच्यासह सर्व नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होता.

नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा संघटनात्मकदृष्ट्या अधिक सक्षम होत असून, महिलांसाठी सामाजिक, सांस्कृतिक व विकासात्मक उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. त्यांचे नेतृत्व हे महिलांना आत्मविश्वास, सन्मान व प्रगतीच्या दिशेने नेणारे असल्याचे यावेळी स्पष्टपणे दिसून आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.