जिल्हा

माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांना पितृशोक

गडचिरोली :- येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, वसंत विद्यालयाचे सेवा-निवृत्त शिक्षक तथा माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांचे वडील शंकरराव बालाजी पिपरे यांचे आज . 27 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2.00 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनसमयी ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

स्व. शंकरराव पिपरे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात शेकडो विद्यार्थ्यांना घडवून शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान दिले. साधेपणा, शिस्तप्रियता, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांविषयीची आपुलकी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. शिक्षक म्हणूनच नव्हे तर एक आदर्श व्यक्ती म्हणून ते सर्वांच्या स्मरणात राहतील.

त्यांच्या पश्चात पुत्र माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, अनिल पिपरे, नातू अनुराग पिपरे, ऋषिकेश पिपरे,लोकेश पिपरे सून नगरसेवक योगिता पिपरे (माजी नगराध्यक्ष, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष) तसेच आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा उद्या 28 जानेवारी रोजी सकाळी 11.00 ते 12.00 दरम्यान गडचिरोली येथील रेडी गोडाऊनजवळील निवासस्थानापासून निघणार असून वैनगंगा नदीच्या स्मशान घाटावर (बोरमाडा घाट) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.