मरेगाव येथील महिला व नागरिकांच्या मोर्चाची तहसील कार्यालयावर धडक ! * सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात ग्रामवासी एकवटले * स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याच्या मागणी

AVB NEWS गडचिरोली :- तालुक्यातील मौशीखांब. मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील मरेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरीत केले जात नसल्याने दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो महिला नागरिकांचा आज २१ जानेवारी रोजी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. गोरगरीबांना धान्यापासून वंचीत ठेवणाऱ्या मरेगाव येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी अरविंद कात्रटवार व ग्रामवासीयांनी रेटून धरली.
मरेगाव येथील शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप केल्या जात नसल्याची समस्या नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते अरविंदभाऊ कात्रटवार यांच्यासमोर मांडली. कात्रटवार यांनी नागरिकांची समस्या लक्षात घेऊ न आज बुधवारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. याप्रसंगी तहसीलदारांना निवेदन देऊन स्वस्त धान्य दुकानदारावर कार्यवाही करावी आणि दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा,अशा मागणी केली.
अरविंदभाऊ कात्रटवार यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, गोरगरीब नागरिकांना अन्न व पोषण सुरक्षा पुरविण्याकिरता रास्त दरात पुरेशा प्रमाणात दर्जेदार अन्नधान्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने देशात ५ जुलै २०२३ पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ लागू करण्यात आला आहे सदर अधिनियमांतर्गत अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका ३५ किलो अन्नधान्य तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिमाह प्रतिव्यक्ती ५ किलो अन्नधान्य वितरीत करण्यात येते. केंद्र शासनाच्या ४ डिसेंबर २०२३ च्या अधिसूचेनुसार १ जानेवारी २०२४ ते १ डिसेंबर २०२८ पर्यंत या कालावधीत सदर अन्नधान्य मोफत वितरीत करण्यात येत आहे
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरीत करणे ही स्वस्त धान्य दुकानदाराची जबाबदारी आहे परंतू गडचिरोली तालुक्यातील मरेगाव येथील राशन दुकानदाराकडून धान्याचा काळबाजार करण्यात येत असून शिधापत्रिकांना धान्यापासून वंचीत ठेवण्यात येत आहे शिधापत्रिकाधारक दुकानदारास धान्याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर दिली जातात. गोरगरीब नागरिकांना धान्यापासून वंचीत ठेवणाऱ्या मरेगाव येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करून दुकानदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अरविंदभाऊ कात्रटवार व मरेगाव येथील नागरिकांनी प्रशासनाकडे रेटून धरली.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
याप्रसंगी यादवजी लोहंबरे, गोपाल मोंगरकर, दीपक लाडे, यादव चौधरी, विनोद चापले, स्वप्नील जुमनाके, प्रशांत ठाकूर, दिलीप वलादे,अमित हुलके, गणेश बाबनवाडे, रणजीत वलादे, मधुकर बावणे, पंढरी येलमुले, देवेंद्र वलादे, निरंजना वलादे, शांताबाई येरमे, सुरज वलादे, गिरीश टेकाम, पीयुष सेलोटे, यशवंत मंदिकर, गजानन मडावी, अजय सेलोटे, विमलबाई मडावी, कौशल्या वलादे, यादव बावणे, अमर निंबोल, कुमोद खेवले, जीवन वलादे, दत्ताभाऊ सेलोटे, रेखा मंदिरकर, वासुदेव टेकाम, धनंजय टेकाम, भगवान आत्राम, किशोर अलाम, कैलाश हजारे, नितीन टेकाम, रामभाऊ अलाम, अंजना मेश्राम, कमला धनरे, भाग्यलता अलाम, वनिता मेश्राम, सुवर्णा मेश्राम, उषा टेकाम, नंदा टेकाम, देविदास आत्राम, प्रभाकर मेश्राम, भजन हजारे, सिंदूबाई मेश्राम, अभिषेक मेश्राम, राणी मेश्राम, निर्मला मसराम, कांता शिंदे, शोभा शिंदे, सपना फुरसंगे, वेनु हुलके, मेगा टेकाम, निर्मला शिंदेकर, प्रमोद मडावी, मोहन बावणे, राहुल मडावी, अभिषेक सेलोटे, अक्षय येलमुले, धनराज येलमुले, लक्ष्मण येलमुले, सुरेश शेडमाके, विठ्ठल मंदिरकर, विश्वनाथ धनरे, विलास सेलोटे, मोहन मडावी, प्रेमदास मेश्राम, मोंटू अलाम, महेश येलमुले, मीलींद उईके,रोहित उईके, ललित चंदनखेडे, युवराज कस्तुरे, आशिष शेडमाके, निलेश वलादे, अविनाश सेलोटे, देवराव सेलोटे, तिकाराम सेलोटे, सुरेश शेडमाके, कुसुंबाई सेलोटे, अंजनाबाई बावणे, लक्ष्मी बावणे, संगीता बावणे, सुधीर सलामे, लक्ष्मण अलाम, मंगरुजी सय्याम, सचिन रणदिवे, उषा मडावी, दामिनी वलादे, शीतल सेलोटे, सिंधू सेलोटे, अशा गेडाम, गीता पेंडाम, निर्मला मडावी, सुलोचना नैताम, सुरेखा टेकाम, विमल टेकाम, वेणूबाई मसराम सोनम बावणे, वैजयंता उईके, नूतन मसराम, संध्या सेलोटे, मालता अलाम उपस्थित होते