हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा ही आत्मबल व नवचैतन्याचा उर्जास्त्रोत ! * अरविंद कात्रटवार यांचे प्रतिपादन… * मौशिखांब–मुरमाडी जिल्हापरिषद क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन

AVB NEWS गडचिरोली :- हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचं एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे हृदय जिंकले. त्यांनी आपल्या प्रखर भाषणांतून जनतेला प्रभावित करून आपला मराठी बाणा कायम जोपासला. बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व हे प्रखर होते. त्यांनी मराठी माणसाला एकवटण्याचे कार्य महाराष्ट्रात पार पाडलं. राजकारणापेक्षा समाजकारणावर अधिक भर देऊन सेवाभाव जोपासत जनकल्याणाचा मार्ग दाखवला. त्यामुळे आजही मराठी जनतेमध्ये बाळासाहेबांप्रती आदर कायम आहे. त्यांचे प्रेरणादायी विचार आजच्या युवा पिढीला आणि महाराष्ट्रातील जनतेमध्ये आत्मबल आणि नव चैतन्य निर्माण करणारे आहेत, असे प्रतिपादन अरविंद कात्रटवार यांनी बाळासाहेब ठाकरे जयंतीदिन कार्यक्रमाप्रसंगी केले.
अरविंद कात्रटवार पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी बाणा आणि त्यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान मराठी माणूस कधीही विसरणार नाही. मुखातून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव येताच अंगातील रक्त सळसळते. जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वासच माणसाला यशस्वी करत असतो. माणसाचे आत्मबल नेहमी मजबूत असणे आवश्यक आहे, हे त्यांनी आपल्या कार्य कर्तुत्वातून दाखवून दिले. कोणती समस्या ही सहजासहजी सुटत नसेल तर संघर्ष व आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय पर्याय नाही हे .बाळासाहेबांनी आपल्या मराठी माणसांना पटवून दिल्याचे .अरविंद कात्रटवार म्हणाले
या जयंती दिना निमित्य उपस्थित यादव लोहंबरे, प्रशांत ठाकूर, गोपाल मोंगरकर, यादव चौधरी, जीवन कुरुडकर, विनोद चापळे, स्वप्नील जुमनाके, अमित चौधरी,सुरेश कोलते, दिलीप वलादे, देवेंद्र मुळे, दीपक लाडे, विकास उंदीरवाडे, पुरुषोत्तम सुर्यवंशी, महेश लाजुरकर, विनोद खेवले, लोमेश कुमरे, निकेश कोलते, देवेंद्र कोटगले, धनंजय चापले, आकाश लडके, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, अनिल राऊत, नरेश कावळे, तोकेश सहारे, सुरज कलसार, पुरुषोत्तम उंदीरवाडे, विलास भैसारे, छत्रपती भैसारे, कुसन ढवळे, अंबादास मुन्घाटे, आकाश बानबले, लोकेश नैताम, भगवान चनेकार, राकेश मुन्घाटे, अमोल नन्नावरे, प्रफुल डोईजळ, राजेश धारणे, भोजराज नखाते, रामेश्वर निलकंठ कारेते, साईनाथ उईके, लंकेश भजभुजे, क्रिष्णा भोयर, तरंग वाघमारे, गुलाब निकुरे, धनराज कावळे, अमित चौधरी, गणेश गुंटीवार, युजिन चौधरी, प्रशांत पेंद्राम, खुशाल कारेते, आरिफ ढवळे, संदेश सूर्यवंशी, राजेंद्र मेश्राम, पंकज गेडाम, सचिन गुरुनुले, उमेश गेडाम, धनराज ठेंगे, वामन नीलेकार, गणेश ठाकरे, राजू मुरतेली, सुप्रीम करकाडे, अरविंद ठाकरे, अजय ठाकरे, राहुल मुरतेली, कुमोद भुसारी, नामदेव भुसारी, अनिरुद्ध उरकुडे, रुपेश आवारी, स्वप्नील मंगर, साहिल उरकुडे, संदीप शिवणकर, रवी भुसारी, प्रेमचंद भुसारी, रविंद्र मिसार, निरंजन लोहम्बरे, जगन चापले, प्रभुदास होळी, किशोर मडावी, नेपाल लोहंबरे, कुमदेव आवारी, आकाश भरणे, दीपक कोसमसीले, जयंत मेश्रम, कुणाल आवारी, अजिंक्य नगरडे, सूरज गिरोले, साहिल कोसमसीले, गोपाळ मोगरकर, विलास नैताम, वसंत चलाख, रुमन भांडेकर, गजानन नैताम, स्वप्नील जुमनाके, गंगाधर लटारे, मधुकर सातपुते, अमर निंबोळ, अमित हुलके, निकेश मडावी, विश्वनाथ धंदरे, विठ्ठल मंदिरकर, कवडू धंदरे, मधुकर बावणे, सुरज वलादी, पुरंदर उंदीरवाडे, मोतीराम चंद्रगिरे, अशोक धानफोले, भूषण सहारे, जयदेव मेश्राम, माणिक कारेते शिवसैनिक तथा महिला शिवसैनिका व गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते