उद्या गडचिरोलीत सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन
AVB NEWS गडचिरोली, : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवार (ता. २८) विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्यावर शोककळा पसरली आहे. राजकारणासह समाजकारणातही दैदिप्यमान असलेल्या या व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली अर्पण करण्यासह शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक इंदिरा गांधी चौक परीसरातील राजीव गांधी खुल्या सभागृहात गुरुवार (ता. २९) सायंकाळी ५ वाजता ही सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. या सर्वपक्षीय शोकसभेला सर्वच पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व जनेतेने मोठ्या संख्येत सहभागी होऊन दिवंगत अजितदादा पवार यांच्याप्रती आपल्या शोकसंवेदना व्यक्त कराव्या, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांनी केले आहे.