जिल्हा

‘कोया किंग’ महोत्सवातून घडणार आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन  * गडचिरोली शहरात 28 व 29 जानेवारी रोजी महोत्सवाचे आयोजन  * अमृता फडणविस राहणार उपस्थित

एव्हीबी न्यूज गडचिरोली. :- आदिवासी कला संस्कृतीचे जतन व संवर्धनासाठी 28 व 29 जानेवारी रोजी महाराजा हॉल येथे ‘कोया किंग अॅन्ड क्वीन’ सांस्कृतिक स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन हिरा सुखा बहुउद्देंशिय आदिवासी संस्था व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला विशेश अतिथी म्हणून दिव्यांज फाउुंडेशनच्या संचालिका अमृता फडणविस उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी यांनी आज शनिवारी आयोजीत पत्रकार परिषदेतून दिली.

महोत्सवाचे उद्घाटन माजी खा. अशोक नेते यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी आ. डॉ. मिलींद नरोटे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा, आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त आयुशी सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, मुख्य वनसंरक्षक रमेशकुमार, अधिक्षक अभियंता निता ठाकरे, प्रकल्प अधिकारी अरूण एन प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. ‘कोया किंग अॅन्ड क्वीन’ सांस्कृतिक स्पर्धा महोत्सवाचे हे तिसरे वर्श असून यावर्शी सदर महोत्सवाचे थाटात आयोजन करण्यात आले आहे. महिला नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार परिशदेतून करण्यात आले.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण आयोजन निःशुल्क आहे. स्पर्धकांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क घेतले जाणार नाही. तसेच सहभागी स्पर्धकांच्या राहण्याची व जेवणाची संपूर्ण सोय आयोजकांकडून मोफत करण्यात आली आहे. यासोबतच प्रत्येक स्पर्धकासोबत एका पालकाच्या राहण्याची व जेवणाची सुविधाही निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. आदिवासी संस्कृतीशी संबंधित हस्तकला वस्तू, पारंपरिक साहित्य तसेच खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्टॉलची व्यवस्थाही पूर्णतः मोफत ठेवण्यात आली आहे. यामुळे आदिवासी बांधवांना त्यांच्या कला-कौशल्यासोबत आर्थिक उत्पन्नाचीही संधी मिळणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी परंपरा, लोककला, नृत्य, संगीत, खाद्यसंस्कृती आणि जीवनशैली देशभर पोहोचवण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे. विशेषतः जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ही स्पर्धा केवळ स्पर्धा नसून, आदिवासी संस्कृतीचा उत्सव ठरणार असून देशातील विविध राज्यांतील आदिवासी समाज एकत्र येऊन आपली ओळख, परंपरा आणि अस्मिता अभिमानाने सादर करणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच आदिवासी संस्कृतीचा जनसागर शहरात उसळणार असून, या राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवामुळे गडचिरोलीची ओळख देशपातळीवर अधिक ठळक होणार आहे. या ऐतिहासिक सांस्कृतिक पर्वात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. या पत्रकार परीषदेला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, कोषाध्यक्ष जाहिदा शेख, शहराध्यक्ष स्नेहा मेश्राम, शहर उपाध्यक्ष भूषणा खेडेकर, शहर सचिव राणी गोपशेट्टीवार आदी उपस्थित होते.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.