नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी हळदीकुंकू कार्यक्रमातून वाटला प्रेमाचा गोडवा * नगर परिषद शाळेत हळदीकुंकू कार्यक्रम, महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- स्थानिक नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा रामपूरी येथे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांना प्रोत्साहन देत हळीदीकुंकू कार्यक्रम व महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयेजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद द्विगूणीत केला..नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांना शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रोत्साहित केले
कार्यक्रमाचे उद्घाटन माता सरस्वती आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण व दीपप्रज्वलन नगराध्यक्ष प्रणोती निबोंरकर यांच्या हस्ते करण्यात आले . या समारंभाद्वारे शिक्षण, समाजसेवा आणि महिलांच्या सशक्तिकरणास प्रोत्साहन देण्याचा संदेश दिला गेला.
कार्यक्रमात शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थीनी आणि महिलांचे मोठे प्रमाणात उपस्थिती होती. उपस्थितांनी कार्यक्रमाचा उत्साह वाढवला आणि स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. या स्पर्धांमध्ये , गीत-संगीत, नृत्य, पेंटिंग आणि ज्ञान स्पर्धा यांचा समावेश होता.
या उपक्रमाद्वारे शिक्षणासोबतच सामाजिक संस्कार आणि महिला सशक्तीकरण यावर विशेष भर देण्यात आला, तसेच स्थानिक समुदायामध्ये शाळा व पालक यांच्यातील सहयोग अधिक दृढ झाला. “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक तसेच सांस्कृतिक आवड निर्माण होते, आणि महिलांना सशक्त व आत्मविश्वासी बनण्याची प्रेरणा मिळते.