बसफेरीसाठी टेंभा येथील नागरिक गडचिरोली आगारात धडकले ! * अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात आगार प्रमुखांना निवेदन * बससेवा तातडीने सुरू करणाची केली मागणी

AVB NEWS गडचिरोली:- गडचिरोली आगारातून मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील टेंभा गावापर्यंत दुपारी व सांयकाळची बसफेरी सोडण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो महिला व नागरिकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगारावर धडक दिली. अरविंद कात्रटवार यांनी आगार प्रमुखांना निवेदन देऊन प्रवाशांच्या सेवेसाठी बससेवा तातडीने सुरू करण्याची मागणी केली.
अरविंद कात्रटवार यांनी आगार प्रमुखांशी चर्चा करतांना स्पष्ट केले की, गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब मुरमाडी क्षेत्रातील टेंभा हे गाव दाट वस्तीचे असून या गावात प्रवाशांची संख्या अधिक आहे. परंतू बससेवा अपूरी असल्याने या गावातील महिला नागरिक व शाळेकरी विद्यार्थ्यांना अडचनीचा सामना करावा लागत आहे. मौशींखाब मुरमाडी जिल्हा परिशद क्षेत्रातील महिला व नागरिकांना शासकीय व खासगी कामांसाठी गडचिरोली शहरात यावे लागते. तसेच या भागातील शिक्षण घेणारे विद्यार्थी अधिक असून शाळेत ये.जा करावी लागते. बससेवेअभावी प्रवाशांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागतो. तसेच वाहन वेळेवर मिळत नसल्याने तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. शाळेकरी विद्यार्थी व प्रवांशाची होणारी गैरसोय लक्षात घेता गडचिरोली आगारातून गडचिरोली ते टेंभा अमिर्झा मार्ग दुपारी ४ वाजता आणि सांयकाळी ५ वाजता बसेफेरी सोडण्यात यावी. जेणेकरून प्रवाशांना सुखरूप् प्रवासाची सोय होईल आणि महामंडळाच्या उत्पन्नात सुध्दा भर पडेल, असे अरविंद कात्रटवार यांनी आगार प्रमुखांशी चर्चा करतांना स्पष्ट केले. बसेफेरीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही आगारप्रमुखांनी दिली.
याप्रसंगी यादवजी लोहंबरे, गोपाल मोंगरकर, दीपक लाडे, यादव चौधरी, विनोद चापले, स्वप्नील जुमनाके, प्रशांत ठाकूर, दिलीप वलादे,अमित हुलके, गणेश बाबनवाडे, रणजीत वलादे, मधुकर बावणे, पंढरी येलमुले, देवेंद्र वलादे, सुरज वलादे, गिरीश टेकाम, पीयुष सेलोटे, यशवंत मंदिकर, गजानन मडावी, अजय सेलोटे, यादव बावणे, अमर निंबोल, कुमोद खेवले, जीवन वलादे, दत्ताभाऊ सेलोटे, वासुदेव टेकाम, धनंजय टेकाम, भगवान आत्राम, किशोर अलाम, कैलाश हजारे, नितीन टेकाम, रामभाऊ अलाम, देविदास आत्राम, प्रभाकर मेश्राम, भजन हजारे, अभिषेक मेश्राम, कांता शिंदे, प्रमोद मडावी, मोहन बावणे, राहुल मडावी, अभिषेक सेलोटे, अक्षय येलमुले, धनराज येलमुले, लक्ष्मण येलमुले, सुरेश शेडमाके, विठ्ठल मंदिरकर, विश्वनाथ धनरे, विलास सेलोटे, मोहन मडावी, प्रेमदास मेश्राम, मोंटू अलाम, महेश येलमुले, मीलींद उईके,रोहित उईके, ललित चंदनखेडे, युवराज कस्तुरे, आशिष शेडमाके, निलेश वलादे, अविनाश सेलोटे, देवराव सेलोटे, तिकाराम सेलोटे, सुरेश शेडमाके, सुधीर सलामे, लक्ष्मण अलाम, मंगरुजी सय्याम, सचिन रणदिवे, विमल टेकाम उपस्थित होते