आ. परिणय फुके यांची आकाश अग्रवाल यांनी घेतली भेट ! * देसाईगंज शहराच्या विकासासह विविध विकासात्मक बाबीवर केली चर्चा

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- नुकत्याच पार पडलेल्या देसाईगंज नगरपरिषद निवडणूकीत भाजपाने दणदणीत विजय मिळविला. भाजपाने विजयाची ‘ हॅट्रिक ’ साधून नगरपालिकेवर सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केली आहे. या विजयाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्हा भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल यांनी विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन नगर पालिकेचे नवनिर्वाचीत उपाध्यक्षसह सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी आ. फुके यांनी त्यांचे स्वागत करून नगरपालिका निवडणूकीतील विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल यांनी आ. परिणय फुके यांच्याशी स्थानिक पातळीवरील जनतेच्या समस्या, विकासाच्या संधी, देसाईगंज शहराच्या विकासाबाबत नियोजन तसेच विविध विकासात्मक बाबीवर सखोल चर्चा केली. देसाईगंज शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून मुबलक निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही आ. परिणय फुके यांनी दिली. या भेटीप्रसंगी नगर पालिकेचे उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी, नगरसेवक राजू जेठाणी, भोला पटेल, दुबे महाराज उपस्थित होते.