ताज्या घडामोडी

गडचिरोली नगरपालिकेत बहुमतात असलेली भाजपा अजीत पवार गटाला सत्तेत वाटा देणार काय ?  * राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तेत सहभागी करून घेण्यास कार्यकर्त्यांचा विरोध,  * उपाध्यक्ष, बांधकाम सभापतीपदावरून रस्सीखेच

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- नुकत्याच पार पडलेल्या गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपाने घवघवीत यश प्राप्त केले. भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणोती निंबोरकर आणी तब्बल 15 नगरसेवकांनी विजय मिळविला. आता खातेवाटपाकडे लक्ष लागले आहे.

नगरपालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत असल्यामुळे कुणाच्या पाठींब्याची गरज नाही. मात्र भाजपा राज्यात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस अजीत पवार गटाला सत्तेत सहभागी करून घेणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तेत सहभागी करून घेण्यास भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. अशात भाजपा मध्ये उपाध्यक्ष व सभापती पदावरून ओढताण सुरू झाल्याचे चित्र दिसून आहे. विशेश म्हणजे सलग दुसर्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या भाजपाच्या नगरसेवकांनी उपाध्यक्ष व बांधकाम सभापतीपदावर डोळा ठेवला आहे. भाजपाकडून उपाध्यक्ष व सभापतीपदासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतांना भाजपा राष्ट्रवादी कॉंग्रेस अजीत पवार गटाला सत्तेत सहभागी करून घेणार काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भाजपाचे गडचिरोली नगरपालिकेत जे 15 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी 10 नगरसेवक नवखे असून ते पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना नगरपरिशदेच्या प्रशासकीय कामकाजाचा कोणताही अनुभव नाही. माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर आणि माजी सभापती मुक्तेश्वर काटवे हे जुने शिलेदार नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. हे तिन्ही नगरसेवक उपाध्यक्ष व सभापती पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. अशातच अनिल कुनघाडकर यांना यापुर्वी उपाध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. सलग पाच वर्श त्यांनी उपाध्यक्षपद भुशविले. त्यामुळे कुनघाडकर यांना उपाध्यक्ष अथवा महत्वाचे पद असलेले बांधकाम सभापतीपद मिळण्याची शक्यता कमी आहे., उपाध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे व माजी पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे हे इच्छूक आहेत. नगरपालिकेत महिला नगराध्यक्ष असल्याने उपाध्यक्षपद पुरूशाला देण्याचा विचार होउु शकतो. त्यामुळे मुक्तेश्वर काटवेंना उपाध्यक्षपदाची संधी मिळू शकते. जर का उपाध्यक्षपदी योगीता पिपरेंना संधी दिल्यास काटवेंना बांधकाम सभापतीपची संधी मिळण्याची शक्यता आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपाची भिस्त सर्वाधीक तेली समाजावर अवलंबून आहे. त्यामुळे भाजपाच्या जेश्ठ नेत्यांना चारदा विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे. सभापतीपद वाटप करतांना जातीपातीचा विचार न करता सबंधीत पक्षासाठी दिलेले योगदान, किती काळापासून पक्षसेवेत आहे, पक्षासाठी केलेले कार्य, पक्षासाठी राबविलेले उपक्रम आदी बाबीचा विचार करण्याची गरज आहे. अशातच अजीत पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत सहभागी झाल्यास भाजपाच्या गोटात मिठाचा खड पडू शकतो आणी एक महत्वाचे पद भाजपाच्या कोटयातून कमी होऊ शकते, असे भाजपाच्या कार्यकर्त्यांचें म्हणणे आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.