समाजातील दुटप्पी लोकांना धडा शिकविणार : – सत्कार समारंभात नगरसेवक बाळू टेंभुर्णेचे प्रतिपादन * वंचित बहुजनांची न्याय-हक्काची लढाई आता नगर परिषद सभागृहात लढणार

एव्हीबी न्यूज गडचिरोली – परिवर्तन पॅनलच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवक तथा वंचित बहुजन आघाडी चे नेते बाळूभाऊ टेंभुर्णे यांचा सत्कार कार्यक्रमइंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात आयोजित करण्यात आला “सामाजिक व राजकीय दृष्ट्या वंचित बहुजनांची न्याय-हक्काची लढाई आता नगर परिषद सभागृहात लढणार असून समाजातीलच काही लोकांनी मला हरविण्यासाठी प्रयत्न केले अशा दुटप्पी लोकांना सुद्धा समाजाने धडा शिकवावा ” असे आवाहन सत्कारमूर्ती नवनिर्वाचित नगरसेवक बाळूभाऊ टेम्भूर्णे यांनी केलें.
“पॅनल तर्फे मी एकटा जरी निवडून आलो तरी सत्ताधारी लोकांना शहराचा विकासासाठी खुर्ची ला हलविण्याची ताकद आम्ही ठेवू, पुढील 5 वर्षात शहराचा चेहरा बदलविण्यास आम्ही भाग पाडू ” असेही यावेळी ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सामाजिक कार्यकर्त्या वनिता बांबोळे यांनी भूषवले. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर दीक्षाभूमी बचाव आंदोलनाचे नेते अभियंता बंडू उर्फ नागवंश नगराळे उपस्थित होते.नवनिर्वाचित नगरसेवक बाळूभाऊ टेंभुर्णे यांचा सत्कार गडचिरोली परिवर्तन पॅनल कडून सपत्निक करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख अतिथी बंडू नगराळे म्हणाले की परिवर्तन पॅनल तर्फे गडचिरोली नगरपरिषदेत विविध बहुजन आंबेडकरी पक्षांनी एकत्रित येऊन कौतुकास्पद उपक्रम राबवित जो विजय खेचून आणला याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीला समोरही सुगीचे दिवस आहेत.
अध्यक्षीय भाषणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या वनिता बांबोळे म्हणाल्या की, नगरसेवक झालेल्या बाळूभाऊ सारख्या एकाच झुंजार निखाऱ्या द्वारे निवडणुकीत दिलेल्या जाहीरनाम्या प्रमाणेच संपूर्ण गडचिरोली शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम आम्ही तेवत ठेवू.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून नगरसेवक बाळू टेंभुर्णे यांना अभिनंदनास्पद पुष्प स्तुती सुमने वाहिली. परिवर्तन पॅनलच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे संचालन सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ गोवर्धन तर प्रास्ताविक धर्मानंद मेश्राम व आभार प्रदर्शन विश्वरत्न युथ फाउंडेशनचे वृषभ रामटेके यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मानंद मेश्राम, सिद्धार्थ गोवर्धन, जीके बारसिंगे, सुखदेव वासनिक, नागसेन खोब्रागडे, ऋषभ रामटेके, प्रतीक डांगे, राहुल मेश्राम, सतीश दुर्गमवार, सोनाशी लभाने आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.