‘ग्रामसेवक हटाव, कामगार बचाव’ महाआक्रोश मोर्चाने प्रशासन हादरले..! * सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात हजारो कामगार एकवटले.. * तीन हजार कामगारांच्या मोर्चाची जिल्हा परिषदेवर धडक. * कामगारांना ग्रामपंचायतीतून प्रमाणपत्र देण्याची मागणी

एव्हीबी न्यूज गडचिरोली “- १३ ऑगस्ट २०२४ शासन राजपत्रानुसार कामगारांना ग्रामपंचायतीकडून प्रमाणपत्र देण्यात यावे व प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी ८ जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेवर हजारो कामगारांचा ‘ग्रामसवेक हटाव, कामगार बचाव’ महाआक्रोश धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रासह जिल्हयातील इतर भागातील कामगारांनी मोर्चात सहभागी होऊन जिल्हा परिषदेवर धडक दिली. कामगारांच्या भव्य आक्रोश मोर्चामुळे प्रशासन चांगलेच हादरले.
मोर्चा जिल्हा परिषदेवर काढण्यापुर्वी चंद्रपूर मार्गावरील देवकूले प्रांगणात आयोजीत करण्यात आलेल्या सभेत सामाजिक कार्यकर्ते अरविंदकात्रटवार व जेष्ठ समाजसेवक प्रकाश ताकसांडे यांनी तीन हजारापेक्षा अधिक संख्येने उपस्थित असलेल्या महिला, पुरूष कामगारांना संबोधीत केले. जाहीर सभेनंतर मोर्चा आयटीआय चौक मार्गे जिल्हा परिषदेवर नेण्यात आले. कामगारांना प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे, प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसवेकांवर कारवाई झालीच पाहिजे, ग्रामसेवक हटाव, कामगार बचाव’, अरविंदभाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है. अशा गगनभेदी घोषणा देऊन कामगारांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून सोडला. त्यानंतर जिल्हा परिषदेचे अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी भुयार व इतर वरिष्ठ अधिकारी दाखल झाले व मागण्यांबत तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वास दिले.
असंघटीत कामगारांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही… अरविंद कात्रटवार यांचा इशारा
सामाजिक कार्यकर्ते अरविंदभाऊ कात्रटवार यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिले की, राज्य शासनाच्या वतीने बांधकाम व इतर कामगांरासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात आहेत. यामध्ये सामाजिक सुरक्षा, कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक योजना, कामगारांसाठी आरोग्य विषय सुविधा आणि आर्थिक पाठबळ देणाऱ्या योजनांचा समावेश आहे. कामगार म्हणून योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्याअनुशंगाने १३ ऑगस्ट २०२४ रोजी राज्य शासनाने राजपत्र सुध्दा काढले आहे, परंतू मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील ग्रामसेवकांकडून कामगारांना प्रमाणत्र देण्यास नकार देण्यात येत असल्याने हजारो कामगार योजनेच्या लाभापासून वंचीत आहेत कामगारांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचीत ठेवणाऱ्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करावी. असंघटीत कामगारांवरील अन्याय कदापी खपवून घेतला जाणार नाही. कामगार प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीने न केल्यास यापुढे ‘जेलभरो’ आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अरविंद कात्रटवार यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिला.
अरविंद कात्रटवारांनी कामगारासाठी उभारलेला लढा कौतुकास्पद… प्रकाश ताकसांडे
तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहचल्या पाहिजेत. तेव्हाच गोरगरीब नागरिकांचा विकास घडून येईल. सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार यांनी असंघटीत कामगारांच्या हक्कासाठी काढलेला मोर्चा हा लोकशाही व संविधानिक आहे. संविधानिक हक्क कामगारांना मिळाले पाहिजेत. अरविंदभाऊ कात्रटवार अन्यायाविरोधात लढणारा नेता आहे. त्यांनी असंघटीत कामगारांना संघटीत करून कामगारांच्या न्याय हक्कासाठी मोर्चाच्या माध्यमातून लढा उभारला हे कौतुकास्पद आहे. ते कामगाराना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील कामगारांनी अरविंद कात्रटवार यांच्या पाठी सदैव राहावे, असे आवाहन जेष्ठ समाजसेवक प्रकाशजी ताकसांडे यांनी केले.
पोलीस विभागाच्या ‘दादालोरा खिडकी’ योजनेचे कौतुक…
एकीकडे शासन गोरगरीब कामगारांच्या कल्याणासाठी योजना राबविते आणि दुसरीकडे कामगारांच्या हक्कासाठी मोर्चा काढण्याची वेळ येते, हे शासन व प्रशासनाचे अपयश असल्याचे अरविंद कात्रटवार यांनी स्पष्ट करीत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अरविंदभाऊ कात्रटवार यांनी गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘दादालोरा खिडकी’ योजनेचे कौतुक केले पोलीस विभागाने या माध्यमातून अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आदिवासी भागात शासनाच्या योजना घराघरापर्यंत पोहचवून लाभ दिला जात आहे. शासनाच्या विविध योजना एकछताखाली राबवून नागरिकांना विविध दाखले व योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. तर जिल्हा परिषद प्रशासन का करू शकत नाही, असा सवालही अरविंद कात्रटवार यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भुयार व उपस्थित इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना केला.
मोर्चाची क्षणचित्रे
1) मोर्चात तीन हजारापेक्षा अधिक महिला व पुरूष कामगारांचा सहभाग
2) शिस्तबध्द काढलेल्या मोर्चाची एक किलोमीटर पर्यंत रांग लागली होती.
3) कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
4) मोर्चेकरूंसाठी चाय, नाश्ता व थंडपाण्याची सोय करण्यात आली होती.
5) मोर्चासाठी मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यामध्ये महिला कामगारांची संख्या सर्वाधीक होती.
6) मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकल्यानंतर जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या बाहेर येऊन अरविंद कात्रटवार यांच्याशी चर्चा केली आणि तातडीने सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.
यावेळी यादवजी लोहंबरे, प्रशांत ठाकूर, सुरेश कोलते, दिलीप वलादी, देवेंद्र मुळे, दीपक लाडे, विकास उंदीरवाडे, गोपाल मोगरकर, महेश लाजुरकर, विनोद खेवले, लोमेश कुमरे, निकेश कोलते, देवेंद्र कोटगले, धनंजय चापले, आकाश लडके, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, अनिल राऊत, नरेश कावळे, तोकेश सहारे, सुरज कलसार, पुरुषोत्तम उंदीरवाडे, विलास भैसारे, छत्रपती भैसारे, कुसन ढवळे, अंबादास मुन्घाटे, आकाश बानबले, लोकेश नैताम, भगवान चनेकार, राकेश मुन्घाटे, अमोल नन्नावरे, प्रफुल डोईजळ, राजेश धारणे, भोजराज नखाते, रामेश्वर निलकंठ कारेते, साईनाथ उईके, लंकेश भजभुजे, क्रिष्णा भोयर, तरंग वाघमारे, गुलाब निकुरे, धनराज कावळे, अमित चौधरी, गणेश गुंटीवार, युजिन चौधरी, प्रशांत पेंद्राम, खुशाल कारेते, आरिफ ढवळे, संदेश सूर्यवंशी, राजेंद्र मेश्राम, पंकज गेडाम, सचिन गुरुनुले, उमेश गेडाम, धनराज ठेंगे, वामन नीलेकार, गणेश ठाकरे, राजू मुरतेली, सुप्रीम करकाडे, अरविंद ठाकरे, अजय ठाकरे, राहुल मुरतेली, कुमोद भुसारी, नामदेव भुसारी, अनिरुद्ध उरकुडे, रुपेश आवारी, स्वप्नील मंगर, साहिल उरकुडे, संदीप शिवणकर, रवी भुसारी, प्रेमचंद भुसारी, रविंद्र मिसार, निरंजन लोहम्बरे, जगन चापले, प्रभुदास होळी, किशोर मडावी, नेपाल लोहंबरे, कुमदेव आवारी, आकाश भरणे, दीपक कोसमसीले, जयंत मेश्रम, कुणाल आवारी, अजिंक्य नगरडे, सूरज गिरोले, साहिल कोसमसीले, गोपाळ मोगरकर, विलास नैताम, वसंत चलाख, रुमन भांडेकर, गजानन नैताम, स्वप्नील जुमनाके, गंगाधर लटारे, मधुकर सातपुते, अमर निंबोळ, अमित हुलके, निकेश मडावी, विश्वनाथ धंदरे, विठ्ठल मंदिरकर, कवडू धंदरे, मधुकर बावणे, सुरज वलादी, पुरंदर उंदीरवाडे, मोतीराम चंद्रगिरे, अशोक धानफोले, भूषण सहारे, जयदेव मेश्राम, माणिक कारेते व जिल्ह्यातील कामगार बांधव हजारोच्या संख्येनी उपस्थित होते.