प्रणोती निंबोरकर यांनी स्वीकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार * पारदर्शक प्रशासन व लोकाभिमुख निर्णय घेणार असल्याचे केल.स्पष्ट

AVB NEWS गडचिरोली – गडचिरोली नगर परिषदेवर प्रचंड मताधिक्य घेऊन निवडून आलेल्या ॲड. प्रणोती निंबोरकर यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. नगर परिषद गडचिरोली कार्यालय येथे पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने नगरपरिषद गेटपासून फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत नवनिर्वाचित नगराध्यक्षा, नगरसेवक व पदाधिकारी सभागृहात दाखल झाले. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरणात औक्षण करत जल्लोषात स्वागत केले.
पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अँड. सौ. प्रणोती निंबोरकर यांनी गडचिरोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त केला. स्वच्छता, पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा, पारदर्शक प्रशासन व लोकाभिमुख निर्णय यांना प्राधान्य देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.
नगरपरिषद कार्यालय येथे पार पडलेल्या पदग्रहण सोहळ्याला भारतीय जनता पार्टीचे १५ नगरसेवक,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ६, काँग्रेस पक्षाचे ५, वंचित आघाडीचे १ नवनिर्वाचित नगरसेवक या पदग्रहण सोहळ्याला हजर होते. नवनिर्वाचित नगराध्यक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या पदग्रहण सोहळ्याला प्रामुख्याने आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र तथा गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रभारी कीर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडिया, आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र डॉ. मिलिंद नरोटे,जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, प्रशांत वाघरे, सहकार महर्षी प्रकाश पोरेड्डीवार,माजी आमदार डॉ. देवराव होळी,जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे,किसान मोर्चा रमेश भुरसे,महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखा डोळस,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर,जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, गोवर्धन चव्हाण यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.