वस्त्रभेटीतून अरविंद कात्रटवार मित्रपरिवाराने वाटला माताभगिनींना प्रेमाचा गोडवा… ! * अमिर्झा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्य वस्त्रभेट कार्यक्रम

AVB NEWS गडचिरोली :- अरविंद कात्रटवार मित्र परिवाराच्या वतीने स्त्रीशिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सेवाभाव दिन म्हणून साजरी करण्यात आली. जयंती दिनाचे औचित्य साधून मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अमिर्झा येथे शेकडो माताभगिनींचा सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते वस्त्रभेट देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यामातून अरविंद सामाजिक संदेश दिला.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर वस्त्रभेटीचा कार्यक्रम पार पडला. सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार, जेष्ठ समाजसेवक प्रकाश ताकसांडे यांनी क्रांतीज्योतीच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संकटाचा धैर्याने सामना करून पुढे जावे – अरविंद कात्रटवार
वस्त्रभेट कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शेकडो माताभगिनींना मार्गदर्शन करतांना अरविंद कात्रटवार म्हणाले की, ज्ञानज्योती सवित्रीबाई फुलेंनी स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. त्यांचे कार्य शिक्षण, समानता आणि समाजातील दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्वाचे आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाला स्त्रीच्या सक्षमीकरणाचे सर्वात मोठे साधन मानले, सामाजिक विरोध, अपमान आणि टीका सहन करूनही त्यांनी आपला मार्ग सोडला नाही, त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष आजच्या पिढीसाठी धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाची शिकवण देणारा आहे आहे. त्यामुळे प्रत्येक माताभगिनींनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श जोपासून आलेल्या संकटाचा धैर्याने सामना करून पुढे गेले पाहिजे तरच जीवनात यश मिळते. मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील माताभगिनींच्या विकास होऊन त्या आर्थिकदृश्टया आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत हे आपले ध्येय आहे. महिलांनी स्वयंरोजगाराची कास धरली पाहीजे. त्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार यांनी केले.
मार्गदर्शन करतांना जेष्ठ समाजसेवक प्रकाश ताकसांडे म्हणाले की, महिलांचा विकास घडवून आणायचा असेल तर सर्वप्रथम त्यांचा आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे. शिक्षण हेच जीवनातील अंधकार दूर करण्याचे माध्यम हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी ओळखले आणि स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली. बालविवाह, सती प्रथा यांसारख्या अनिष्ट रूढींविरुद्ध लढा दिला आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सामाजिक समानता आणण्यासाठी कार्य केले. प्रत्येक महिलांनी सावित्रीबाईंचा आदर्श जोपासून वाटचाल केली तर महिलांचा सर्वांगीण विकास घडून येईल, असे प्रकाश ताकसांडे म्हणाले.
याप्रसंगी यादव लोहंबरे, गोपाल मोंगरकर, दीपक लाडे, प्रशांत ठाकूर, यादव चौधरी, देवेंद्र मुळे, गणेश ठाकरे, राजकुमार शेंडे सर, सुरेश कोलते, विलास नैताम, दीपक वलादे, विनोद खेवले, पुरुषोत्तम कुमरे, राहुल सावरकर, राजेंद्र मेश्राम, मोहित लाजूरकर, मयुर भोयर, आशिष शेडमाके, सुचित मारणवरे, विनोद नन्नावरे, दिनेश मानगुडदे, चेतन मानगुडदे, नितेश घोडमारे, भुजंग गरमडे, यश दोडके, मोहन मंगर, सुरेश नागरे, विवेक सावसाकडे, भुषण गोहरकर, कैलाश लाडे, मधुकर बावणे, सारंग शेलोटे, स्वप्नील मांडवकर विलास ढोलने, राजेश जवादे, जीवन कुरुडकर व गावकरी उपस्थित होते