देसाईगंज शहरासह विविध प्रलंबीत प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांना साकडे ! * माजी आ. गजबे यांच्या नेतृत्वात आकाश अग्रवाल व पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट

AVB NEWS गडचिरोली :- मुंबई येथील वर्षा या शासकीय निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस यांच्याशी मा. माजी आमदार कृष्णा गजबे, राजू जेठानी स्वीकृत नगरसेवक तथा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष, भाजपा उद्योग आघाडी गडचिरोली जिल्हा अध्यक्ष आकाश अग्रवाल व देसाईगंज नगर परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी, यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्याशी मतदारसंघातील विविध प्रश्न, समस्या आणि प्रलंबित विकास कामांविषयी सविस्तर चर्चा केली.
या भेटीत ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रोजगारनिर्मिती यासह विविध विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर विचारमंथन केले. आणि विशेषतः देसाईगंज नगरपरिषद येथे विकास कामाकरिता जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि उद्योग, रोजगार, उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.