श्रीमद् भागवत कथा म्हणजे मानवजातीला अचूक मार्ग दाखविणारा ‘ज्ञानयज्ञ’ सोहळा * मौशिखांब–मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राचे लोकनेते अरविंद कात्रटवार यांचे प्रतिपादन, * येंरडी येथे श्रीमद् भागवत सप्ताह सोहळा

AVB NEWS GADCHIROLI :- श्रीमद् भागवत कथा ही भगवान विष्णू आणि त्यांच्या दशावतारांचे, विशेषतः श्रीकृष्ण लीलेचे रसाळ वर्णन करणारी पवित्र कथा आहे. भगवान श्रीकृष्णाच्या लीलाभक्तीआणि ज्ञानाचा अद्भुत सागर आहे. श्रीमद भागवत कथा म्हणजे संसारातील भय दुःख यांचा समूळ नाश करणे; मानवजातीला भक्तीचा अचूक मार्ग दाखविणारा ‘ज्ञानयज्ञ’ सोहळा आहे. असे प्रतिपादन मौशिखांब–मुरमाडी जिल्हापरिषद क्षेत्राचे लोकनेते अरविंद कात्रटवार यांनी केले.
कुरखेडा तालुक्यातील येरंडी येथे कथावाचक श्री. हरीशजी चतुर्वेदी महाराज यांच्या श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ कथेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अरविंदभाऊ कात्रटवार बोलत होते.
अरविंद कात्रटवार पुढे म्हणाले की, आपल्या भारतीय संस्कृती मध्ये हजारो वर्षापासूनची वैदीक परंपरा आहे. यामध्ये समाज आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती कोणत्याही जात, पंथ, धर्माचा असला तरी प्रत्येक जीवनाचे कल्याण व्हावे आणि जीवनात परमोच्च अत्यानंदाची अनूभूती घेता यावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. भागवत ग्रंथात केवळ कथा नसून प्रत्येक जीवांचा उध्दार कसा करावा हे सांगितले आहे. या ग्रंथातून मानवजातीला जीवनाचा अचूक मार्ग दाखविण्यात आला आहे. भागवताकडे केवळ कथा म्हणून नव्हे तर या कथांचे आपल्या जीवनात काय महत्व आहे आणि आपण त्यातील काय आत्मसात करायचे हे आपल्यालाअवगत झाले पाहिजे. भागवत ग्रंथ म्हणजे ‘ज्ञानयज्ञ सोहळा असून त्यातील तत्वज्ञान प्रत्येकांनी आत्मसात केले पाहिजे, असेही अरविंद कात्रटवार
याप्रसंगी यादवजी लोहबरे, गोपाल मोगरकर, यादवजी चौधरी, विनोद चापले, दिपक लाडे, प्रशांत ठाकूर, स्वप्नील जुमनाके व गावकरी उपस्थित होते