मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात गुंजला ‘जय भवानी, जय शिवाजी’ चा निनाद..! * अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी शिवजयंती सोहळा उत्साहात…
राज्यकर्त्यांनी शिव छत्रपतींचा आदर्श जोपासून राज्य कारभार करण्याची गरज..! अरविंद कात्रटवार यांचे प्रतिपादन..

AVB NEWS गडचिरोली :- सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला… भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला… हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला…. असे शूर, पराक्रमी राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात उत्साहात साजरी करण्यात आली. अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी शिवजयंती सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. ‘जय भवानी, जय शिवाजी’ च्या गजराने संपुर्ण जिल्हा परिषद क्षेत्र निनादून गेला.
मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील मुरमाडी, आंबेशिवणी, आंबेटोला, आंबेशिवणी टोली, भिकारमौशी, अमिर्झा, टेंभा, चांभार्डा, कळमटोला, गिलगाव, रानखेडा, बेलगाव व मरेगाव येथे शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व गावे भगव्या पताकांनी सजली होती. युवक, महिला नागरिकांमध्ये उत्साह ओसांडून वाहत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याप्रमाणे. जि.प. क्षेत्रातील गावातील नागरिकांनी ‘शिवछत्रपती’ च्या प्रतिमेला माल्यार्पण करून मानाचा मुजरा केला.
कार्यक्रमाप्रसंगी नागरिकांना संबोधीत करतांना अरविंद कात्रटवार म्हणाले की, साडेतीनशे वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीतं एका कर्तृत्वान वीरपुत्राचा जन्म झाला, ज्यांनी आपल्या स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवा फडकविला. असे थोर पराक्रमीचे राजे म्हणजे ‘शिव़छत्रपती शिवाजी महाराज होय. मुखात शिवाजी महाराजांचे नाव उच्चारताच अंगात रक्तसंचारून उर्जा निर्माण होते. यावरून त्यांच्या विरतेची प्रचिती आपल्याला येते. छत्रपती शिवाजी महाराज उत्तम शासक होते. राज्यकारभार कसा करावा, हे शिव़छत्रपतींनी साऱ्या जगाला दाखवून दिले. शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायां नंतरही अनेक राजे उदयास आले, पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनाच.असेही अरविंद कात्रटवार म्हणाले
याप्रसंगी यादवजी लोहंबरे, गोपाल मोंगरकर, दीपक लाडे, यादव चौधरी, विनोद चापले, स्वप्नील जुमनाके, प्रशांत ठाकूर, दिलीप वलादे,अमित हुलके, गणेश बाबनवाडे, रणजीत वलादे, मधुकर बावणे, पंढरी येलमुले, देवेंद्र वलादे, सुरज वलादे, गिरीश टेकाम, पीयुष सेलोटे, यशवंत मंदिकर, गजानन मडावी, अजय सेलोटे, यादव बावणे, अमर निंबोल, कुमोद खेवले, जीवन वलादे, दत्ताभाऊ सेलोटे, वासुदेव टेकाम, धनंजय टेकाम, भगवान आत्राम, किशोर अलाम, कैलाश हजारे, नितीन टेकाम, रामभाऊ अलाम, देविदास आत्राम, प्रभाकर मेश्राम, भजन हजारे, अभिषेक मेश्राम, कांता शिंदे, प्रमोद मडावी, मोहन बावणे, राहुल मडावी, अभिषेक सेलोटे, अक्षय येलमुले, धनराज येलमुले, लक्ष्मण येलमुले, सुरेश शेडमाके, विठ्ठल मंदिरकर, विश्वनाथ धनरे, विलास सेलोटे, मोहन मडावी, प्रेमदास मेश्राम, मोंटू अलाम, महेश येलमुले, मीलींद उईके,रोहित उईके, ललित चंदनखेडे, युवराज कस्तुरे, आशिष शेडमाके, निलेश वलादे, अविनाश सेलोटे, देवराव सेलोटे, तिकाराम सेलोटे, सुरेश शेडमाके, सुधीर सलामे, लक्ष्मण अलाम, मंगरुजी सय्याम, सचिन रणदिवे, विमल टेकाम उपस्थित होते
