गडचिरोली भाजपाच्या बैठकीत उडाली शाब्दीक चकमक ? * नगर परिषद सभापती निवडीवरून प्रकार घडल्याची सर्वत्र चर्चा * स्विकृत नगसेवक निवडीवरून उठले होते वादळ * उद्याच्या सभापती निवडणूकीकडे लागले लक्ष
एव्हीबी न्यूज गडचिरोली :- भारतीय जनता पार्टीसाठी जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या गडचिरोली नगरपरिषदेची निवडणूक उमेदवारी वाटपापासून चांगली वादळी ठरली आहे. या निवडणूकीत भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणोती निंबोरकर यांनी दणदणीत विजय प्राप्त केला असला तरी मागील निवडणूकीपेक्षा यावेळेस ६ नगरसेवक भाजपाचे कमी झाले आहेत. भाजपा मधील गटबाजी स्विकृत नगरसेवक निवडीवरून सुध्दा उफाळून आली होती. आता पुन्हा सभापती निवडीवरून मतभेद निर्माण होऊन बैठकीत जेष्ठ नेत्यांमध्ये शाब्दीक चकमक उडाल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. हे प्रकरण केवळ शाब्दीक न राहता हाणामारी पर्यंत पोहचल्याची चर्चा गडचिरोली शहरभर रंगली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणूकीत भाजपा यश प्राप्त केले असले तरी पद वाटपावरून आरोप प्रत्योरापाच्या फैरी सुरू आहेत. केवळ आपल्या मर्जीनुसार झाले पाहिजे असा हट्टाहास बाळगूण पक्षातील दोन तीन नेत्यांनी दबातंत्राचे राजकारण सुरू केल्याचा आरोप काही निश्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला असून स्विकृत नगरसेवक निवडीवरून भाजपा मधील गटबाजीचे राजकारण उजेडात आले आहे.
स्विकृत नगरसेवक निवडीत शब्द देऊन सुध्दा निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचे टीकास्त्र गडचिरोली भाजपाचे जेष्ठ नेते रमेश भुरसे यांनी पत्रकार परिषदेतून सोडले होते. सभापती निवडीत सुध्दा त्या नेत्यांची ‘मक्तेदारी’ चालू देणार नाही याचा विरोध म्हणून काल १९ जानेवारी रोजी पार पडलेल्या बैठकीत सभापती निवडीवरून मतभेद निर्माण होऊन जेष्ठ नेत्यांमध्ये शाब्दीक चकमक उडाल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे
उद्या २१ जानेवारी रोजी गडचिरोली नगरपालिकेच्या सभापती पदाची निवडणूक होणार आहे. भाजपाचे १५ नगरसेवक निवडून आले असून बहुमतात असलेली भाजपा अजीत पवार गटाला सोबत घेणार काय आणि सभापती पदावर कोणाला संधी देणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.