जिल्हा
निखील चरडे गडचिरोली नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी * स्विकृत नगरसेवकपदी भाजपाचे सागर निंबोरकर, सुधाकर येनगंधलवार, तर कॉंग्रेसचे नंदू कायरकर यांची निवड

एव्हीबी न्युज गडचिरोली :- गडचिरोली नगरपालिकेच्या उपाध्यक्ष व स्विकृत नगरसेवकपदाची निवड प्रक्रिया आज 15 जानेवारी रोजी पार पडली. उपाध्यक्षपदी भाजपाचे निखील चरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर स्विकृत नगरसेवकपदी भाजपाचे सागर निंबोरकर, सुधाकर येनगंधलवार, तर कॉंग्रेसचे नंदू कायरकर यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचीत उपाध्यक्ष व स्विकृत नगरसेवकांचे नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष
रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, गोविंद सारडा व समस्त नगसेवकांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.