अंधारलेल्या वाटेवर ज्ञानरूपी प्रकाशज्योत पेटवूया……. आदिवासीबहुल गडचिरोलीत राज्यभरातील अंध विद्यार्थ्यांची वारी ! * गडचिरोलीत अंध कल्याण शैक्षणिक सप्ताहाचे आयोजन * राष्ट्रीय दृष्टीहीन संघ व मैत्री परिवार संस्थेचा संयुक्त उपक्रम * गडचिरोली वगळता राज्यभरातील 15 अंध विद्यालयातील 350 विद्यार्थ्यांचा सहभाग

AVB NEWS गडचिरोली :- अंधारलेल्या वाटेवर ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटवूया …. ही संकल्पना बाळगूण दृष्टीहीन मुलामुलींना जगण्याचे बळ देत स्वप्न पाहायला शिकवून ती स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वासाचे बळ निर्माण करणे, त्यांच्या कलागुणांना वाव देऊन व्यक्तीमत्वाचा विकास घडवून आणणे, दृष्टीहीन विद्यार्थ्यांना मायेची ऊब देऊन समाजात आणि विविध क्षेत्रात वावरण्यासाठी सक्षम करणे या हेतूने राष्ट्रीय अंध कल्याण संघ व मैत्री परिवार संस्था गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली येथे शैक्षणिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये राज्यभरातील अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन विविध स्पर्धांमध्ये आपल्या कलागुणांची छाप पाडीत आपल्या कलागुणांनी आणि वक्तृत्वांने उपस्थितांचे मन जिंकून प्रभावीत केले. शैक्षणिक सप्ताहाच्या निमित्याने राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्हयात राज्यभरातील १५ शाळांमधील ३५० अंध विद्यार्थी गडचिरोली शहरात दाखल झाले आहेत.
राष्ट्रीय दृष्टीहीन संघ व मैत्री परिवार शाखा गडचिरोलीच्या वतीने स्थानिक अभिनव लॉन मध्ये ८ ते १२ जानेवारी पर्यंत राज्यभरातील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 36 व्या ‘अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हयात अंध विद्यार्थ्यांसाठी विद्यालय नसतांनाही मैत्री परिवार संस्था गडचिरोलीचे अध्यक्ष निरंजन वासेकर यांनी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या मदतीला धावून येत गडचिरोली शहरात अंध कल्याण शैक्षणिक सप्ताहाच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावून मानवता व सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले आहे. त्याचबरोबर श्री साई इन्स्टीटयुट तथा नर्सिग कॉलेज वाकडी, लॉयड मेटल्स लि. व पोलीस विभागाचे सुध्दा या कार्यक्रमाला मोठे पाठबळ मिळाले.
अंध कल्याण शैक्षणिक सप्ताहात पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नांदेड, हिंगोली आणि विदर्भातील , नागपूर, चंद्रपूर येथील विद्यार्थ्यांसह राज्यातील 15 जिल्हयातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. काल 8 जानेवारी रोजी शैक्षणिक सप्ताहाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे राज्याध्यक्ष रघुनाथ बारड होते. स्वागताध्यक्ष म्हणून मैत्री परिवार संस्थेचे निरंजन वासेकर यांच्यासह राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघ व मैत्री परिवार संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शैक्षणिक सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी मैत्री परिवार संस्थेचे निरंजन वासेकर,डॉ. अमित साळवे , दिलीप गडपल्लीवार, प्रकाश मुद्दमवार, प्रदीप गुंडावार, अविनाश चडगुलवार, नगरसेक शेखर आखाडे,’उदय धकाते धकाते मैत्री परिवारातील सदस्यांचे सहकार्य लाभत आहे. तसेच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे व त्यांची वैद्यकीय चमू तसेच श्री साई इन्स्टीटयुट तथा नर्सिग कॉलेज वाकडी येथील बीएसी नर्सिंग व जीएनमचे विद्यार्थी या सामाजिक उपक्रमात सेवा बजावीत आहे.
8 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी गायन व वादन स्पर्धा, 9 जानेवारी रोजी वक्तृत्व, काव्यवाचन व गायन स्पर्धा, 10 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता ब्रेल लिपी वाचन, नृत्य, निबंध लेखन स्पर्धा तसेच सांयकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत गडचिरोली शहरातील नागरिकांसाठी रोशनी म्युजीकल ग्रुप नागपूर यांचा ऑक्रेस्टस आयोजीत करण्यात आला आहे. 11 जानेवारी रोजी मनाचे श्लोक व प्रश्नमंजूशा आयोजीत केली जाईल आणि 12 डिसेंबर रोजी बक्षीस वितरण व शैक्षणिक सप्ताहाचा समारोप होणार आहे. गडचिरोली शहरवासीयांनी अंध विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोलीबद्दलचा नकारात्मक दृष्टीकोन बदलण्याची गरज
गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. परंतू आता या जिल्हयाची ओळख आता स्टील हब व औद्योगीकरणाकडे वाटचाल करणारा म्हणून निर्माण होत आहे. जिल्हयातील नक्षलवाद संपुश्टात येण्याच्या मार्गावर आहे. असे असले तरी राज्यातील काही जिल्हयामधील नागरिकांमध्ये गडचिरोलीबाबत नकारात्मक दृष्टीकोन कायम आहे. गडचिरोलीबद्दल जो नकारात्मक दृष्टीकोन आहे तो आता इतर राज्यातील नागरिकांनी बदलण्याची गरज आहे.
आजही नक्षलवाद जिल्हा म्हणून ओळले जात असल्याचा प्रयत्य गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अंध कल्याण शैक्षणिक सप्ताहामाध्यमातून दिसून आला आहे. नक्षलवादाच्या भितीने काही जिल्हयातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नसल्याची माहिती देण्यात आली. राज्यातील सर्व शाळा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तयार होत्या मात्र विद्यार्थ्यांचें पालक आपल्या पाल्यांना गडचिरोलीला पाठविण्यास तयार नसल्याने काही जिल्हयातील विद्यार्थी शैक्षणिक सप्ताहात सहभागी होवू शकले नसल्याची माहिती आयोजनकांकडून देण्यात आली. मात्र जे विद्यार्थी सहभागी झाले त्यांना गडचिरोलीबद्दल चांगला अनुभव आला व त्यांनी आनंद व्यक्त केला. विशेश म्हणजे राज्यात प्रथमच गडचिरोली येथे आयोजीत कार्यक्रमाला पोलीस प्रशासनासह मैत्री परिवार संस्था, लॉयड मेटल्स कंपनी , श्री साई इन्स्टीटयुट तथा नर्सिग कॉलेज वाकडी व इतरांकडून जे सहकार्य मिळाले असे सहकार्य राज्यात कुठेच मिळाले नाही,
त्यामुळे गडचिरोली येथील अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह संस्मरणीय ठरला आहे, असे गौरोद्गार नागपूर येथील मारूती सेवा मंडळाचे अध्यक्ष सुहास खरे यांनी काढले.