जिल्हा
धान खरेदीसाठी शेतकरी नोंदणीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
AVB NEWS गडचिरोली : – आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२५-२६ साठी शेतकरी ऑनलाइन नोंदणीला आता ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनमार्फत गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदी प्रक्रिया राबविली जात आहे. शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या पत्रानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
शेतकरी बांधवांनी आपला पिकविलेला धान कोणत्याही व्यापाऱ्याला कमी दरात न विकता, शासनाच्या आधारभूत दराचा लाभ घ्यावा. यासाठी तालुक्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर त्वरित ऑनलाइन नोंदणी करून आपला धान केंद्रावरच विक्री करावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही. एस. तिवाडे यांनी केले आहे.