भाजपा औद्योगीक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांची घेतली भेट !** राईस मिल उद्योगासह विविध समस्यांबाबत वेधले लक्ष

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणविस काल २७ डिसेंबर रोजीगोंडवाना विद्यापीठ आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या सार्वजनिक.खाजगी भागीदारीतून स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थ संस्थेचे उद्घाटन व पोलीस दलाच्या वतीने आयोजीत महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले होते. या दरम्यान भाजपा औद्योगीक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल यांनी माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच जिल्हयातील राईस मिल उद्योग व इतर विविध विषयाकडे लक्ष वेधून समस्या तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. त्याअनुषंगाने ना. फडणविस यांनी प्रलंबीत समस्या तातडीने मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही आकाश अग्रवाल यांना दिली.
याप्रसंगी सहकार महर्शी अरविंद सा.पोरेड्डीवार, आ. डॉ. मिलींद नरोटे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, सहकार नेते प्रकाश सा. पोरेड्डीवार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी नगराध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, देसाईगंजच्या नवनिर्वाचीत नगराध्यक्ष लता सुंदरकर, आरमोरीचे नवनिर्वाचीत नगराध्यक्ष रूपेश पुणेकर आदी उपस्थित होते- त्याचबरोबर आकाश अग्रवाल यांनी गडचिरोली शहराच्या नवनिर्वाचीत नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.