विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेत प्रवेशीत विद्यार्थ्यांना विदेश विद्यापीठात शिकण्याचे संधी प्राप्त होणार :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस * गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेचे उद्घाटन

AVB NEWS गडचिरोली :-
गडचिरोली जिल्ह्याची मागास ही ओळख आता पुसून नवा चेहरा जगाच्या पुढे येणार आहे . गडचिरोली जिल्हा महाराष्ट्राच्या शेवटचा जिल्हा नसून तो महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे. विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेत प्रवेशीत विद्यार्थ्यांना विदेश विद्यापीठात शिकण्याचे संधी प्राप्त होणार आहे . ही तंत्रज्ञान संस्था गडचिरोली या जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी तंत्र कौशल्य शिक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे . गडचिरोली या जिल्ह्यातील आदिवासी भागात तांत्रिक शिक्षण बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. गडचिरोलीच्या इतिहासाचे सुवर्णपान विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेच्या उद्घाटनाने लिहिलं जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीकेले .
गोंडवाना विद्यापीठाचे मेसर्स लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेड समवेत सार्वजनिक खाजगी-भागीदारी तत्वावर आयोजित संस्था ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था’गडचिरोलीचा उद्घाटन समारंभ आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अडपल्ली येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री पंकज भोयर , विशेष अतिथी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, आमदार धर्मरावबाबा आत्राम,लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लि.चे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लि. चे लेफ्टनंट कर्नल (निवृत्त ) विक्रम मेहता, कार्यकारी संचालक व्यंकटेश सौंदर्यराजन, निवासी संचालक लॉर्ड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड हिंम्मत सिंग बेदला, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रशांत मोहिते, विवेक गोर्लावर, गुरूदास कामडी, संजय गोरे, लेमराज लडके, रंजना लाड, विद्यापीठाचे न. न. व. सा. संचालक तथा विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेचे प्रभारी संचालक प्रा. मनीष उत्तरवार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद%