उद्या गडचिरोलीत संत जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळा * तेली समाज बांधवांनी कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- श्री संत जगनाडे महाराज जन्मोत्सव समिती गडचिरोलीच्या वतीने उद्या शनिवार 27 डिसेंब रोजी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या 401 व्या जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे. सदर कार्यक्रम आरमोरी मार्गावरील श्री संताजी स्मृती प्रतिश्ठाण सभागृहात आयोजीत करण्यात आला आहे. कार्यक्रमाला तेली समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळी 10 वाजता श्री संताजी जगनाडे महाराज यांची पालखी व मिरवणू काढण्यात येईल. पालखी शहरातील प्रमुख मार्गाने पिफरविण्यात येईल. त्यानंतर दुपारी 12 वाजता जन्मोत्सव कार्यक्रम होईल. दुपारी 1.30 वाजता गायक प्रल्हाद रायते व संच यांचा सुप्रसिध्द गितांचा कार्यक्रम होईल. दुपारी 3.30 वाजता रक्क्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.
कार्यक्रमाला तेली समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संत जगनाडे महाराज जन्मोत्सव समिती गडचिरोलीच्या वतीने करण्यात आले आहे.