नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकरांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांची भेट ! मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन; गडचिरोली शहराच्या विकासाची दिली ग्वाही

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- भाजपाच्या नवनिर्वाचीत नगराध्यक्ष अॅड प्रणोती निंबोरकर यांनी नुकतीच मुंबई गाठून मुख्यमंत्री देवेंद फडणविस यांची सदिच्छा भेट घेतली. ना. फडणविस यांनी निंबोरकर यांचे अभिनंदन करून गडचिरोली शहराच्या विकासासाठी सर्वोत्तपरी मदत केली जाईल अशी ग्वाही नगराध्यक्षा प्रणोती निंबोरकर यांना दिली.
या भेटीदरम्यान शहराच्या सर्वांगीण विकास आराखड्यावर सखोल, सकारात्मक आणि ठोस चर्चा करण्यात आली.रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा, रोजगारनिर्मिती आणि भविष्यातील महत्त्वाच्या विकासकामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीठाम शब्द दिला, ही बाब शहरासाठी अत्यंत आश्वासक ठरत आहे.या भेटीमुळे शहराच्या राजकीय व विकासात्मक वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून,शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष प्रणोतीताई किती सजग, सक्रिय आणि परिणामकारक नेतृत्व देत आहेत,
हे स्पष्टपणे दिसून आले आहे.
या महत्त्वपूर्ण भेटीवेळी आमदार बंटी भांगडिया,माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,,गोविंद सारडा, सागर निंबोरकर, माजी आमदार नामदेव उसेंडि, माजी आमदार देवरावजी होळी उपस्थित होते.