अरविंद कात्रटवार यांच्या वतीने देशमुख कुटुंबियास आर्थिक मदत * अमिर्झा टोली येथील रामदास कार्तिक देशमुख यांच्या निधनाबद्दल अरविंद कात्रटवारांनी व्यक्त केला शोक * यादवजी लोहंबरे व कार्यकर्त्यांनी कुंटुंबियांची घेतली भेट

AVB NEWS गडचिरोली :- गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिशद क्षेत्रातील अमिर्झा टोली येथील रामदास कार्तिक देशमुख यांचे २१ डिसेंबर रोजी निधन झाले. रामदासच्या निधनाबद्दल सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. अरविंदभाऊ कात्रटवार यांचे सहकारी यादवजी लोहंबरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह देशमुख कुटुंबियांच्या निवासस्थानी जाऊन अरविंद कात्रटवार यांच्या वतीने आर्थिक मदत दिली आणि परिवाराचे सांत्वन केले.
याप्रसंगी अरविंद मित्रपरिवारातील कार्यकर्ते दीपक लाडे स्वप्नील जुमनाके, यांच्यासह देशमुख कुटुंबीय आणि गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी यादवजी लोहंबरे यांनी देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करीत अरविंद कात्रटवार यांनी रामदासच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केल्याचे सांगून कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. कुटंबाला कोणत्याही मदतीची गरज भासल्यास अरविंदभाऊ कात्रटवार सदैव तत्पर असल्याचे सांगून देशमुख कुटुंबाला मानसिक आधार दिला.