जिल्हा
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजीत पवार गट) उमेदवार लिलाधर भरडकर यांचा एकतर्फी विजय

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- गडचिरोली नगर परिषद निवडणूकीत भाजपाने पुन्हा एकदा घवघवीत यश प्राप्त केले आहे. नगराध्यक्षासह भाजपाचे नगरसेवकपदाचे 15 उमेदवार विजयी झाले आहेत. गडचिरोली नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजीत पवार गट) 5 उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 11 मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लिलाधर भरडकर यांनी भाजपाचे उमेदवार अनिल तिडके यांचा 1354 मतांनी पराभव करीत एकतर्फी विजय प्राप्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार लिलाधर भरडकर यांना 1771 मते मिळाली, तर भाजपाचे उमेदवार अनिल तिडके यांना केवळ 411 मते मिळाली.