निवडणूकीत एका मताचे महत्व आले कळून ! * गडचिरोलीत काँग्रेसचे उमेदवार श्रीकांत देशमुख केवळ एका मताने विजयी * प्रभाग क्रमांक 4 मधील लढतीने वेधले लक्ष

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- गडचिरोली नगर परिशद निवडणूकीत भाजपाने पुन्हा एकदा घवघवीत यश प्राप्त केले आहे. नगराध्यक्षासह भाजपाचे नगरसेवकपदाचे 15 उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र प्रभाग क्रमांक 4 मधील चुरशीच्या लढतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रभागातून काँग्रेसचे उमेदवार श्रीकांत देशमुख केवळ एका मताने निवडून आले असून त्यांच्या विजयाची गडचिरोली शहरात सर्वत्र चर्चा रंगली आहे. देशमुख यांनी भाजपाचे उमेदवार संजय मांडवगडे यांचा एका मताने पराभव करीत ऐतिहासीक विजय नोंदविला.
प्रभाग क्रमांक 4 मधील अटीतटीच्या लढतीत कॉंग्रेसचे उमेदवार श्रीकांत देशमुख यांना 714 मते मिळाली तर भाजपाचे उमेदवार संजय मांडवगडे यांना 716 मते मिळाली. केवळ एका मताने पराभव झाल्याने भाजपाच्या गोटात शांतता तर कॉंग्रेसच्या गोटात जल्लोश वातावरण निर्माण झाले. मांडवगडे यांनी निकालावर आक्षेप घेत फेरमोजणीची मागणी केली. मात्र निवडणूक निर्णय अधिकार्यांनी सर्व प्रक्रिया कायदेशिर असल्याचे स्पष्ट करीत निकाल जाहिर केला. श्रीकांत देशमुख यांच्या विजयाची शहरात सर्वत्र चर्चा रंगली होती.