जिल्हा

गडचिरोली जिल्हयातील तिन्ही नगरपरिषद निवडणूकीत कमळ फुलले !* देसाईगंज मध्ये भाजपाची विजयाची हॅट्रीक , तर गडचिरोली व आरमोरीत भाजपाचा सलग दुसरा विजय ***तिन्ही नगरपरिषदेमध्ये भाजपाला  बहुमत

एव्हीबी न्यूज गडचिरोली  :- गडचिरोली जिल्हयातील तिन्ही नगरपालिका निवडणूकीचे निकाल आज रविवारी जाहीर झाले. नगर परिशद निवडणूकीत भाजपाने आपला वरचश्मा कायम ठेवला असून गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज या तिन्ही नगर पालिका निवडणूकीत दणदणीत विजय प्राप्त केला आहे. गडचिरोलीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या प्रणोती निंबोरकर, देसाईगंजच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या लता सुंदर आणि आरमोरीच्या नगराध्यक्षपदी भाजपाचे रूपेश पुनेकर विजयी झाले.

गडचिरोली नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत भाजपाच्या प्रणोती निंबोरकर यांनी 4 हजार 839 मतांनी विजय संपादन केला. आरमोरीत भाजपाचे उमेदवार रूपेश पुणेकर 1 हजार 904 मतांनी विजयी झाले, तर देसाईगंज मध्ये भाजपाच्या लता सुंदरकर यांनी केवळ 516 मतांनी विजय संपादन केला.
आरमोरी व गडचिरोलीत राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजीत पवार गट) उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर देसाईगंजमध्ये कॉंग्रेसच्या उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या देसाईगंज मध्ये भाजपाने विजयाची हॅट्रीक साधली असून गडचिरोली व आरमोरीत सलग दुसऱ्यांदा विजय संपादन केला आहे.
—————————
तिन्ही नगरपालिकांमध्ये भाजपाला बहुमत
गडचिरोली नगरपालिकेत 27 पैकी भाजपाचे 15, कॉंग्रेस 6, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजीत पवार) 5 आणि अपक्ष 1
आरमोरी नगरपालिकेत 20 पैकी भाजपा 15, कॉंग्रेस 4, शिंदेसेना 1
देसाईगंज नगरपालिकेत 21 पैकी भाजपा 12, कॉंग्रेस 7, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजीत पवार गट 2

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.