नागदिवाळी महोत्सवातून आदिवासी माना जमातीने घडविले एकतेचे दर्शन..! अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते माणिकादेवी मुर्ती प्राणप्रतिष्ठा व पुजन * अमिर्झा (अमरपूर ) येथे नागदिवाळी महोत्सव व माणिकदेवी प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा
आदिवासी माना जमातीच्या नागदिवाळी महोत्सव व माता माणिकादेवी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळयाला उसळला जनसागर!

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना अमिर्झा (अमरपूर) च्या वतीने नागदिवाळी महोत्सव व माता माणिकादेवी मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजीत करण्यात आला. या उत्सावासाठी भाविकांचा मोठया प्रमाणात जनसागर उसळला. लोकनेते अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते माणिकादेवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व पुजन करण्यात आले. या उत्सवामुळे वातावरण भक्ती आणि आनंदमय निर्माण झाले होते.
माणिकदेवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापुर्वी गावातून शोभायात्रा काढण्यात आली . या शोभायात्रेत मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील लोकनेते तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार व त्यांच्या या क्षेत्रातील शेकडो कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन महोत्सवाचा आनंद द्विगुणीत केला. १३ डिसेंब रोजी सायंकाळच्या सुमारास मुठपूजन व माता माणिकेचे पुजन, १४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता शोभयात्रा काढण्यात आली. शोभयात्रा गावातून काढण्यात आल्यानंतर माता माणिकादेवी मुर्ती प्राणप्रतिश्ठा व उद्घाटन सोहळा पार पडला. हजारो आदिवासी माना जमात बांधव व भगिनींनी माता दर्शन घेतले.
उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करतांना अरविंद कात्रटवार म्हणाले की, नागदिवाळी महोत्सव व माता माणिकदेवी मुर्ती प्राणप्रतिष्ठापणेमुळे वातावरण भक्तीमय झाले आहे. नागदिवाळी महोत्सव आणि माता माणिकदेवी मुर्ती प्राणप्रतिश्ठा सोहळा केवळ माना जमात बांधवांच्या श्रध्दा आणि भक्तीपुरताचा मर्यादीत नसून यातून समाजाच्या एकतेचे दर्शन घडले आहे. नागदिवाळी महोत्सवाच्या माध्यमातून माना समाज एकवटला असून समाजबांधवांनी घडविलेले एकतेचे दर्शन हे एकमेकांप्रती स्नेहभाव निर्माण करणारे आहे. समाज संघटीत झाला तरच समाजाच्या समस्या सूटू शकतात. त्यामुळे संघटनशक्ती आवश्यक असून समाजबांधवांनी नेहमी संघटीत राहावे, असे पतिपादन अरविंद कात्रटवार यांनी केले.
आदिवासी माना जमात आजही विकासापासून वंचीत आहे. समाजाच्या समस्या सुटल्या पाहीजेत. त्यांच्या अधिकार हक्काचे रक्षण झाले पाहिजे. माना समाज विकसीत समाज म्हणून पुढे आला पाहिजे यासाठी आपण कटीबध्द असून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर आहे. आदिवासी माना समाज बांधवांनी माता नागदिवाळी महोत्सव व माणिकादेवी मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळयासाठी मला जो सन्मान दिला याप्रती मी समाजाचा ऋणी असून यापुढे सुध्दा समाजाने सहकार्याची भावना जोपासून मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिशद क्षेत्राचा लोकप्रतिधी म्हणून सेवेची संधी द्यावी, असे आवाहन अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले. माता माणिकदेवी सर्वांच्या इच्छा व आकांक्षा पुर्ण करो, अशी मनोकामना अरविंद कात्रटवार यांनी केली.
याप्रसंगी यादव लोहंबरे, प्रशांत ठाकूर, दीपक लाडे, गोपाल मोंगरकर, यादव चौधरी, जीवन कुरुडकर, विनोद चापळे, स्वप्नील जुमनाके, अमित चौधरी, दिलीप वलादे, देवेंद्र मुळे, विकास उंदीरवाडे, पुरुषोत्तम सुर्यवंशी, विनोद खेवले, लोमेश कुमरे, देवेंद्र कोटगले, धनंजय चापले, आकाश लडके, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, अनिल राऊत, नरेश कावळे, तोकेश सहारे, सुरज कलसार, पुरुषोत्तम उंदीरवाडे, विलास भैसारे, छत्रपती भैसारे, कुसन ढवळे, आकाश बानबले, लोकेश नैताम, भगवान चनेकार, राकेश मुन्घाटे, अमोल नन्नावरे, प्रफुल डोईजळ, राजेश धारणे, भोजराज नखाते, रामेश्वर निलकंठ कारेते, साईनाथ उईके, लंकेश भजभुजे, क्रिष्णा भोयर, तरंग वाघमारे, गुलाब निकुरे, धनराज कावळे, अमित चौधरी, गणेश गुंटीवार, युजिन चौधरी, प्रशांत पेंद्राम, खुशाल कारेते, आरिफ ढवळे, संदेश सूर्यवंशी, राजेंद्र मेश्राम, पंकज गेडाम, सचिन गुरुनुले, उमेश गेडाम, *पुरुषोत्तम सुर्यवंशी, महेश लाजुरकर, विनोद खेवले, लोमेश कुमरे, निकेश कोलते, देवेंद्र कोटगले, धनंजय चापले, आकाश लडके, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, अनिल राऊत, नरेश कावळे, तोकेश सहारे, सुरज कलसार, पुरुषोत्तम उंदीरवाडे, विलास भैसारे, छत्रपती भैसारे, कुसन ढवळे, अंबादास मुन्घाटे, आकाश बानबले, लोकेश नैताम, भगवान चनेकार, राकेश मुन्घाटे, अमोल नन्नावरे, प्रफुल डोईजळ, राजेश धारणे, भोजराज नखाते, रामेश्वर निलकंठ कारेते, साईनाथ उईके, लंकेश भजभुजे, क्रिष्णा भोयर, तरंग वाघमारे, गुलाब निकुरे, धनराज कावळे, अमित चौधरी, गणेश गुंटीवार, युजिन चौधरी, प्रशांत पेंद्राम, खुशाल कारेते, आरिफ ढवळे, संदेश सूर्यवंशी, राजेंद्र मेश्राम, पंकज गेडाम, सचिन गुरुनुले, उमेश गेडाम, धनराज ठेंगे, वामन नीलेकार, गणेश ठाकरे, राजू मुरतेली, सुप्रीम करकाडे, अरविंद ठाकरे, अजय ठाकरे, राहुल मुरतेली, कुमोद भुसारी, नामदेव भुसारी, अनिरुद्ध उरकुडे, रुपेश आवारी, स्वप्नील मंगर, साहिल उरकुडे, संदीप शिवणकर, रवी भुसारी, प्रेमचंद भुसारी, रविंद्र मिसार, निरंजन लोहम्बरे, जगन चापले, प्रभुदास होळी, किशोर मडावी, नेपाल लोहंबरे, कुमदेव आवारी, आकाश भरणे, दीपक कोसमसीले, जयंत मेश्रम, कुणाल आवारी, अजिंक्य नगरडे, सूरज गिरोले, साहिल कोसमसीले, गोपाळ मोगरकर, विलास नैताम, वसंत चलाख, रुमन भांडेकर, गजानन नैताम, स्वप्नील जुमनाके, गंगाधर लटारे, मधुकर सातपुते, अमर निंबोळ, अमित हुलके, निकेश मडावी, विश्वनाथ धंदरे, विठ्ठल मंदिरकर, कवडू धंदरे, मधुकर बावणे, सुरज वलादी, पुरंदर उंदीरवाडे, मोतीराम चंद्रगिरे, अशोक धानफोले, भूषण सहारे, जयदेव मेश्राम, माणिक कारेते आदी गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
