आधारभूत धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीला मुदवाढ द्या, * राकाँचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांची मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे मागणी

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- शासकीय आधारभूत धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता शासनाने मुदवाढ द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष ) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी मुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
अतुल गण्यारपवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, शासकीय आधारभूत धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता १५ डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. मात्र ऑनलाईन नोंदणी करतांना सर्व्हेर डाउुन तसेच अन्य तांत्रिक अडचनीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागला. तसेच नोंदणीची मुदत कमी होती. त्यामुळे गडचिरोली जिल्हयातील हजारो शेतकरी ऑनलाईन नोंदणी करू शकले नाही. गडचिरोली जिल्हयातील गोरगरीब शेतकरी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचीत राहू नये, यासाठी ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अतुल गण्यारपवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री देवेद्र पफडणविस यांच्याकडे केली आहे.