प्रा. राजेश कात्रटवारांच्या वाढदिवशी 18 रक्तदात्यांनी रक्तदान करून घडविले सामाजिक बांधीलकीचे दर्शन…! महिला व बाल रूग्णालयात अन्न व वस्त्रदान, ***** विविध सामाजिक उपक्रमांनी प्रा. राजेश कात्रटवार यांचा वाढदिवस उत्साहात

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते तथा न. प. चे माजी बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उस्ताहात साजरा करण्यात आला. दिवसभर प्रा. कात्रटवार यांच्यावर विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व मित्रमंडळी कडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी प्रा. कात्रटवार यांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याबद्दल स्तुती केली.
येथील जिल्हा महिला रुग्णालयात प्रा. कात्रटवार मित्र परिवारातर्फे रुग्णांना फळवाटप, रुग्णांच्या नातेवाईकसाठी अन्नदान तसेच शेकडो महिलांना वस्त्रदान करण्यात आले. 18 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले.
प्रा. कात्रटवार मित्र परिवाराकडून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचे उदघाट्न राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रिपाई नेते ऍड. राम मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी प्रसिद्ध साहित्यिक प्रा. संध्या येलेकर, सुनिल डोगरा, दीपक मडके, प्रफुल्ल बिजवे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा डॉ. सोनल कोवे, प्रा. रमेश चौधरी प्रा. सुनिता साळवे, गायत्री सोमणकर,सुवर्णा पवार आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका पॅड देण्यात आला. त्यानंतर आयोजित रक्तदान शिबीरात 18 जणांनी रकदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. सायंकाळी मित्र परिवारातर्फ केक कापून प्रा. कात्रटवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राजेश कात्रटवार यांच्या मित्र परिवरातील कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
