शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्य गरजवंतांना ब्लॅंकेट वाटप * जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या मार्गदर्शनात उपक्रम

AVB NEWS चामोर्शी :- जेष्ठ नेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ( शरद पवार पक्ष ) सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या मार्गदर्शनात सेवाभाव दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्य अतिदुर्गम अशा माडे मुधोली येथील गोरगरीब आदिवासी व मागासवर्गीय महिलांना 536 ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला चामोर्शी नगरपंचायतीचे नगरसेवक अमोल गण्यारपवार, विकास तांदूळ गिरणीचे अध्यक्ष करण गण्यारपवार, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू आत्राम, राष्ट्रवादी सेवादलाचे अध्यक्ष प्रभाकर भेंडारे, गुलाब धोती, सुरेश परसोडे, मुरखळा चकचे माजी सरपंच मधुकर चिंतलवार, आमगाचे उपसरपंच विनोद शेंगर, नरेंद जुवारे, पंकज देलकर, प्रभाकर भेंडारे, अंतकला मडावी, अजिंक्य गण्यारपवार, यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी आयोजीत केलेल्या ब्लॅंकेट वाटप उपक्रमाचे सर्वांनी कौतूक केले.