जिल्हा
माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांची घेतली भेट. * जिल्हयातील तलाठी कार्यालयाच्या बांधकामासह महसूल विभागांच्या समस्यांकडे वेधले लक्ष

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- नागपूरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. उसेंडी यांनी गडचिरोली जिल्हयातील तलाठी कार्यालयाच्या बांधकामासह महसूल विभागाच्या विविध समस्यांकडे ना. बावनकुळे यांचे लक्ष वेधले.
जिल्यातील अनेक तलाठी कार्यालय जीर्ण झाले आहे. व काही ठिकाणी तलाठी कार्यालय भाड्याच्या खोलीत कामकाज सुरू आहे. त्यासाठी तलाठी कार्यालयाची स्वमालकीची इमारत असणे आवश्यक आहे. तरी तलाठी कार्यालयाचे बांधकाम व दुरुस्ती करण्यासदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे याना भेट देऊन दिवेदन सादर केले. यावेळी मंत्री महोदयांनी या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर कामे मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
