माजी बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार यांचा वाढदिवस सेवाभावदिन म्हणून साजरा होणार * वाढदिवसानिमीत्य आज विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन * कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मित्रपरिवाराचे आवाहन

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा गडचिरोली नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार यांचा वाढदिवस आज 14 डिसेंबर रोजी सेवाभाव दिन म्हणून साधेपणाने साजरा केला जाणार आहे. वाढदिवसानिमित्य राजेश कात्रटवार मित्र परिवारांच्या वतीने गडचिरोली शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रा. राजेश कात्रटवार यांच्या वाढदिवसानिमित्य चामोर्शी मार्गावरील कात्रटवार सभागृहात रक्तदान शिबिर, महिला व बाल रूग्णालयात पफळवाटप, स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड , गोरगरीबांना ब्लॉंकेट वाटप तसेच माणूसकीचा घास या नाविण्यपुर्ण उपक्रमांतर्गत भोजनदान करण्यात येणार आहे. रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन स्वच्छेने रक्तदान करावे, तसेच कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रा. राजेश कात्रटवार मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.