उद्यापासून गोकुळनगरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी सप्ताह – सात दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन, कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे सुखदेव वेठे, अनिल धात्रक यांचे आवाहन

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ गोकुळनगर च्या वतीने उद्या 12 डिसेंबर पासून 18 डिसेंबर पर्यंत मानवतेचे महान पुजारी वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 57 वा पुण्यतिथी सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. तसेच हा सप्ताह सर्वसंत स्मुर्ती मानवता दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.
शुक्रवार 12 डिसेंबर रोजी सकाळी 5.30 वाजता राश्टसंतांच्या प्रतिमेचे पुजन व ग्रामगीता ग्रंथाचे पुजन गडचिरोली येथील धन्वंतरी रूग्णालयाचे संचालक डॉ. अनंता शिवनाथ कुंभारे यांच्या हस्ते होईल. प्रमुख अतिथी म्हणून गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी डॉ. शिवनाथ कुंभारे उपस्थित राहतील. तसेच 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर पर्यंत सामुहिक ध्यान, रामधून, भजन, ग्रामगीता वाचन, सामुदायिक प्रार्थना आदी कार्यक्रम पार पडतील. 18 डिसेंबर रोजी
रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत महाप्रसादाचे वितरण होईल. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामसेवाधिकारी अनिल धात्रक व गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हा संघटक सुखदेव वेठे व गुरूदेव सेवा मंडळाच्या पदाधिकारी यांनी केले आहे.