महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार यशस्वी जीवनाचा मार्ग ! – अरविंद कात्रटवार यांचे प्रतिपादन…मुरमाडी येथे महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे भूमिपुजन…
महापरिनिर्वाण दिनानिमित्य शेकडो बांधवांनी केले महामानवाला अभिवादन..!

..
AVB NEWS :- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, न्याय, स्वातंत्र व बंधूत्वाची शिकवण दिली. शिक्षण हेच सर्वांगीण विकासाचे माध्यम आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मुलमंत्र दिला. मनोधैर्य आणि चिकाटी हेच यशाचे खरे आधारस्तंभ आहेत. विवेक, धैय आणि स्वाभिमान असणारा मनुष्यच समाज परिवर्तन करू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जोपासून वाटचाल केल्यास आपल्या जीवनाचे ‘सार्थक’ होईल, असे प्रतिपादन अरविंद कात्रटवार यांनी केले.
मुरमाडी येथील पंचशिल बौध्द समाजाच्या वतीने पंचशिल बौध्द विहाराच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे भूमिपुजन व महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन व ध्वजारोहन अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. भीमरायाच्या गजराने मुरमाडी परिसर दणाणून गेला. महापरिनिर्वाण दिनानिमित्य शेकडो बांधवांनी महामानवाला अभिवादन केले.
अरविंद कात्रटवार पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील वंचीत घटकांना लोकशाहीच्या प्रवाहात आणून त्यांना समान न्याय व अधिकार मिळवून देण्यासाठी कार्य केले. समाजाच्या विकासात स्त्रियांचे योगदान महत्वपुर्ण आहे. स्त्रियांनी साधलेली प्रगती जितकी अधिक, तितका समाज अधिक प्रगत होईल. सामाजिक स्वातंत्र नसतांना कायद्याने दिलेले स्वातंत्र निरर्थक ठरते. संविधनामुळेचे देशात लोकशाही अस्तित्वात आली. लोकशाही ही केवळ शासनपध्दती नाही, तर ती संयुक्त जीवनाची पध्दती आहे. आपले भविष्य आपल्या हातात असून ते इतरांच्या हातात सोपवू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श जोपासून आपल्या ताकदीच्या बळावर आपले जीवन घडवायचे आहे असा दृढनिश्चय करून वाटचाल करण्याची गरज आहे, असे अरविंद कात्रटवार म्हणाले. मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राचा आणि या क्षेत्रातील गोरगरीबांचा विकास हेच आपले ध्येय असून एक लोकसेवक म्हणून जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. या क्षेत्रातील जनतेंनी आपल्याला जनसेवेची संधी द्यावी असेही अरविंद कात्रटवार म्हणाले.
याप्रसंगी यादव लोहंबरे, प्रशांत ठाकूर, गोपाल मोंगरकर, यादव चौधरी, जीवन कुरुडकर, विनोद चापळे, स्वप्नील जुमनाके, अमित चौधरी,सुरेश कोलते, दिलीप वलादे, देवेंद्र मुळे, दीपक लाडे, विकास उंदीरवाडे, पुरुषोत्तम सुर्यवंशी, महेश लाजुरकर, विनोद खेवले, लोमेश कुमरे, निकेश कोलते, देवेंद्र कोटगले, धनंजय चापले, आकाश लडके, विकास उंदीरवाडे, जयकुमार खेडेकर, अनिल राऊत, नरेश कावळे, तोकेश सहारे, सुरज कलसार, पुरुषोत्तम उंदीरवाडे, विलास भैसारे, छत्रपती भैसारे, कुसन ढवळे, अंबादास मुन्घाटे, आकाश बानबले, लोकेश नैताम, भगवान चनेकार, राकेश मुन्घाटे, अमोल नन्नावरे, प्रफुल डोईजळ, राजेश धारणे, भोजराज नखाते, रामेश्वर निलकंठ कारेते, साईनाथ उईके, लंकेश भजभुजे, क्रिष्णा भोयर, तरंग वाघमारे, गुलाब निकुरे, धनराज कावळे, अमित चौधरी, गणेश गुंटीवार, युजिन चौधरी, प्रशांत पेंद्राम, खुशाल कारेते, आरिफ ढवळे, संदेश सूर्यवंशी, राजेंद्र मेश्राम, पंकज गेडाम, सचिन गुरुनुले, उमेश गेडाम आदी गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.