डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला अर्पण केलेले संविधान भारतीय ‘लोकशाही’ चा मजबूत पाया ! * अरविंद कात्रटवार यांचे प्रतिपादन, संविधान दिनानिमित्य हजारो उपासिकांना वस्त्रभेट
मौशीखांब- मुरमाडी जिल्हा परिशद क्षेत्रात ‘संविधान’ दिनाचा गजर !

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला संविधान अर्पण केले. हे संविधान लोकशाही, न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता याचे प्रतिक असून कायदे आणि नागरिकांचे हक्क निश्चित करते. त्यामुळे हा दिवस देशभर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची आठवण म्हणून मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिशद क्षेत्रातील गावांमध्ये ‘संविधान’ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अरविंद कात्रटवार यांनी संविधान कार्यक्रमाला उपस्थित राहून बौध्द समाज बांधव व भगिनींचा आनंद व्दिगुणित केला.
संविधान दिनाचे औचित्य साधून अरविंद कात्रटवार व मित्रपरिवाराच्या वतीने मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिशद क्षेत्रातील गावांमध्य ‘वस्त्रभेट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शेकडो उपासिकांना वस्त्रभेट देण्यात आली.अरविंदभाऊ कात्रटवार यांनी संविधान दिन कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. अरविंदभाऊ कात्रटवार व मित्र परिवाराच्या वतीने उपासिकांना वस्त्रभेट देण्यात आली.
भारतीय संविधान लोकशाहीचा मजबूत पाया :- अरविंद कात्रटवार
संविधान ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले मोठी देण आहे. हा दिवस देशातील प्रत्येक नागरिकांना त्यांचे हक्क आणि जबाबदारीची आठवण करून देतो. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या निर्मितीतील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा आहे . संविधानामुळे आपल्याला न्याय, स्वातंत्र्य, समता बंधुता स्थापित होऊन नागरिकांना अधिकार आणि हक्क प्राप्त झाले. या मुल्यांचे महत्व जोपासणे आणि त्याचे पालन करणे गरजेचे आहे. संविधानामुळेचे देशात लोकशाही स्थापन झाली. त्यामुळेच भारतीय संविधान हे ‘लोकशाहीचा’ मजबूत पाया आहे, असे प्रतिपादन मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिशद क्षेत्रातील लोकनेते अरविंद कात्रटवार यांनी केले.
याप्रसंगी यादव लोहंबरे, प्रशांत ठाकूर, गोपाल मोंगरकर, यादव चौधरी, विनोद चापळे, स्वप्नील जुमनाके, अमित चौधरी,सुरेश कोलते, दिलीप वलादे, देवेंद्र मुळे, दीपक लाडे, विकास उंदीरवाडे, महेश लाजुरकर, विनोद खेवले, लोमेश कुमरे, निकेश कोलते, देवेंद्र कोटगले, धनंजय चापले, विकास उंदीरवाडे, तोकेश सहारे, पुरुषोत्तम उंदीरवाडे, विलास भैसारे, छत्रपती भैसारे, कुसन ढवळे, राजेंद्र मेश्राम, पंकज गेडाम, जयंत मेश्रम, पुरंदर उंदीरवाडे, भूषण सहारे, जयदेव मेश्राम व गावकरी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.री मोठ्या संख्येनी उपस्थित होते.