राजकीय

गडचिरोली शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या  (शरद पवार गट)  उमेदवारांना निवडून द्या * जिल्हाध्य़क्ष अतुल गण्यारपवार यांचे आवाहन

एव्हीबी न्यूज  :- गडचिरोली गडचिरोली शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर राष्ट्रवादी  कॉंग्रेसच्या  (शरद पवार गट) उमेदवारांना निवडून द्या असें आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी केले. राष्टवादी कॉंग्रेस व उध्दवसेना युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बिपाशा भुसारे व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ गोकुळनगरात भव्य रॅली व प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक राजु साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे राज्य सरचीटणीस अँड. संजय ठाकरे , जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख, ओबीसी सेल अध्यक्ष शेमदेव चापले, राजू भूसारे,सेवादल अध्यक्ष प्रभाकर भेंडारे, अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष हुसैन शेख,जिल्हा उपाध्यक्ष संजय शृंगारपवार,शहर अध्यक्ष एजाज शेख, वैभव शिवनकर, सादीक खा पठाण व नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी बिपाशा भुसारे, नगरसेवक पदाच्या उमेदवारप्रभाग क्र. १२) अ) आशा मुकेश मेश्राम , ब) चंद्रशेखर नरेंद्र नैताम ,प्रभाग क्र. १३) अ)तुळशीराम रुषी सहारे, ब) पुज्या पंकज जवादे क)नीताबाई सुरेश बोबाटे उपस्थित होते. सभेला महिला व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्तावना चंद्रशेखर नैताम, आणि संचालन एजाज शेख यांनी केले आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.