भारतीय लोकशाहीला मजबूत करणारे संविधान हे समता, न्याय व बंधुत्वाचे प्रतिक ! * माजी मंत्री आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन * मौशीखांब- मुरमाडी मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात संविधान दिन; कार्यक्रमाला ५ हजाराहून महिला व नागरिकांची उपस्थिती

AVB NEWS गडचिरोली :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अपर्ण केलेले संविधान हे भारतीय लोकशाहीचा मजबूत पाया असून स्वातंत्र्य , न्याय, समता आणि बंधुत्वाचे प्रतिक आहे. संविधानामुळे नागरिकांना कर्तव्य,अधिकार हक्क प्राप्त झाले आहेत. प्रत्येक नागरिकांचे अधिकार हक्क सुरक्षीत करणारे संविधान जगासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. धर्मरावबाबा आत्राम साहेब यांनी केले. कार्यक्रमा स्थळी आगमन होताच अरविंद भाऊ कात्रटवार समर्थकांनी व भीमसैनिकांनी धर्मरावबाबा आत्राम साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, गडचिरोली जिल्हे का नेता कैसा हो धर्मरावबाबा आत्राम साहेब जैसा हो, धर्मरावबाबा आत्राम साहेब संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, कोणाला रे कोणाला राष्ट्रवादी चा वाघ आला आदी गगनभेदी घोषणांनी मौशीखांब परिसर दणाणून सोडला प्रचंड फटाक्याची आतिषबाजी करीत हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून मा. धर्मरावबाबा आत्राम साहेब यांना कार्यक्रम स्थळी आणले
त्रिरत्न बौद्ध महिला मंडळ बौद्ध समाज मौशीखांब यांच्या वतीने मौशीखांब- मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे. संविधान दिनानिमित्य मौशीखांब येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री आ. धर्मरावबाबा आत्राम बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील लोकनेते अरविंद कात्रटवार, जि.प.चे माजी अध्यक्ष रविंद्र ओलाल्लवार, मुनीश्वर बोरकर, यादवजी लोहंबरे उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना माजी मंत्री आ. धर्मरावबाबा पुढे म्हणाले की, भारतीय संविधान हे देशातील प्रत्येक घटकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांमध्ये संवैधानिक मुल्यांबद्दल आदराची भावना निर्माण झाली पाहिजे. संविधानामुळे समाजातील शोषित, वंचीत घटकांना अधिकार हक्क प्राप्त झाले. त्यामुळे आपल्या देशाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू आहे. लोकशाही मजबूत करण्याची जबाबदारी नागरिकांवर आहे. कर्तव्याचे पालन केल्यानेच अधिकार प्राप्त होतात. कर्तव्यपुर्ती हा सामाजिक व आर्थिक प्रगतीचा मुलभूत घटक आहे. संविधानाचे पावित्र्य जपण्यासाठी प्रत्येकांनी कर्तव्याचे पालन केले पाहिजे, असे आ. धर्मरावबाबा आत्राम म्हणाले. कार्यक्रमाप्रसंगी राष्टवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, माजी, लोकनेते अरविंद कात्रटवार, जि.प.अध्यक्ष रविंद्र ओल्लालवार, मा. मुनीश्वर बोरकर यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी गुणाजी बोरकुटे, विनोदजी डोंगरवार, महेश जुवारे, डॉ. दुर्गे सर, डॉ.चहांदे सर, डॉ. खुणे सर, डॉ. नगराळे सर, डॉ. बाळू साहारे सर, डॉ. निकोडे सर, डॉ. भेसारे सर, डॉ. रामटेके सर, डॉ. वट्टी सर, डॉ. कोवे सर, डॉ. कारेकर सर, डॉ. मंडल सर, डॉ. सप्पाम सर, डॉ.कोडवते, डॉ. नरोटे, डॉ. प्रल्हाद उंदिरवाडे, समर्थ साहेब, सहारे, जाधव मॅडम, दिनेश रामटेके, रघुनाथ दुर्गे, सोनलदीप देवताडे, नाजूक भेसारे, मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षकवृंद जी. प. मौशिखांब, मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षकवृंद, लालाजी पा. खेवले, मा. कोवे, मा. नीताताई साखरे, यादवजी लोहंबरे, प्रशांत ठाकूर, गोपाल मोंगरकर, यादव चौधरी, जीवन कुरुडकर, विनोद चापळे, स्वप्नील जुमनाके, अमित चौधरी,दिलीप वलादे, विलास नैताम, प्रशांत पेंदाम, खुशाल कोरेते, गणेश गुंतेलवार, गणेश ठाकरे, अमित हुलके, राजेंद्र मेश्राम, शुभम समर्थ, अमोल चौधरी, सुशांत उंदिरवाडे, विकास उंदिरवाडे, पिपला भेसारे, संजय भेसारे, संजना उंदिरवाडे, गणेश उंदिरवाडे, विद्याधर उंदिरवाडे, निखिल भेसारे, प्रणव ढवळे, अंकित उंदिरवाडे, दीपक उंदिरवाडे, मेघाशा उंदिरवाडे, प्रतीक उंदिरवाडे, गुलशन ढवळे, चरण सहारे, भगवान लटारे