धोबीघाट बांधकामासाठी अमिर्झाच्या महिलांची जिल्हा परिषदेवर धडक ! – अरविंद कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो महिला एकवटल्या

गडचिरोली :- पाच हजारोपक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा येथील गावतलावात धोबीघाट नसल्याने कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिलांना अडचनीचा सामना करावा लागत आहेत. तसेच तलावात कपडे धुण्यासाठी उतरतांना महिलांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. तलावाच्या पाळीवरून उतरतांना काही महिला घसरून सुध्दा पडल्या आहेत. या गंभिर समस्येकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने संतप्त झालेल्या शेकडो महिलांनी अरविंद कात्रटवार यांचे जनसंपर्क कार्यालय गाठून समस्या मांडली. त्यानंतर अरविंदभाऊ कात्रटवार यांनी शेकडो महिलांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेवर धडक देत प्रशासनाचे समस्येकडे लक्ष वेधले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जलसंधारण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात अरविंद कात्रटवार यांनी स्पष्ट केले आहे, अमिर्झा हे मौशीखांब- मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्वाधीक लोकसंख्येचे गाव आहे. गावालगत मोठा तलाव असून या तलावात गावातील शेकडो महिला दररोज कपडे धुण्यासाठी जातात. तलाव मोठा आणि खोलगट असून तलावात भरपूर पाणी आहे. तलावाची पाळ सुध्दा उंच आहे. त्यामुळे पाळीवरून उतरतांना धोका पत्करावा लागतो. तलावाच्या पाळीवरून उतरतांना कपडे धुण्यासाठी गेलेल्या अनेक महिला घसरून पडल्या आहेत. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवित हाणी झाली नाही. तलावात उतरण्यासाठी पायऱ्यांचे बांधकाम न झाल्यास भविष्यात दुदैवी घटना होण्याची शक्यता नाकारता नाही. या गंभिर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने अमिर्झा गाव–तलावात धोबीघाटाचे बांधकाम करावे, अन्यथा जिल्हा परिषद समोर शेकडो माताभगिनींच्या उपस्थितीत तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अरविंद कात्रटवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंधारण अधिकारी यांना दिला.
आचारसंहितेपुर्वी समस्या मार्गी लावा :- अरविंद कात्रटवार
अमिर्झा येथील धोबीघाटाची समस्या ज्लवंत समस्या असून महिलांच्या सुरक्षेचा विषय आहे. तलावात उतरण्यासाठी पायऱ्या नसल्याने कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिलांना जीव धोक्यात घालावे लागत आहे. ही धोकादायक बाब आहे. जिल्हा परिषदेची निवडूकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते. त्यामुळे अमिर्झा येथील धोबीघाट बांधकाम तातडीने मंजूर करून ते मार्गी लावावेत, अशी मागणी अरविंद कात्रटवार यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जलसंधारण अधिकारी यांच्याकडे केली आहे.
याप्रसंगी यादव पाटील लोहंबरे, प्रशांत ठाकूर, स्वप्नील जुमनाके, गोपाल मोंगरकर, गणेश कात्रटवार, यादव चौधरी, खुशी घोडमारे, कांता मडावी, आशा नारनवरे , पूजा जुमनाके, लता घरत, गीता मेश्राम, अर्पिता कोबळे, शारदा मेश्राम, गायत्री मशाखेत्री, ज्योती नीलेकर, शोभा नीलेकर, करिष्मा म्हशाखेत्री, कीर्ती गेडाम, कुंदा दोडके, मनिषा तोडासे, मीना दुमाने, कविता मडावी, विमल डोंगरवार, अर्चना घोडमारे, अर्चना दोडके, लता उसेंडी, अनुसया मडावी, पार्बता मडावी, कविता चौके, नूतन चौके, यामिनी सिडाम, अंकिता शिरपूरवार, पुष्पा हेडकर, गीता नाहमूर्ती, सुनीता जुमनाके, वंदना सिडाम, पौर्णिमा कुमरे, रजनी घोडमारे, नंदा घोडमारे, सुचिता घोडमारे, ताराबाई तडोसे, पुष्पा दोडके, मंगला दोडके, कविता मडावी, पुष्पा म्हशाखेत्री, संगीता श्रीराम, शशिकला कुळमेथे, दिशा मडावी, कल्पना वाघाडे, मुक्ताबाई कन्नाके, शांता सीडाम, शकुंतला तुमराम, रेवताबाई ढुसे, तिलोतमा भादे, शारदा गेडाम, भावना मानेगुळ्दे, रिना वाघाडे, नीता मिलेकर, रंजना खरवडे, पर्वता नीलेकर, संचिता सीडाम, माधुरी सीडाम, निरंजना शेडमाके, ताराबाई नन्नावरे, अर्चना दोडके, प्रतिभा घोडमारे, ज्योती म्हशाखेत्री, विजया सीडाम, मंजुळा वाकडे, हिराबाई नन्नावरे, प्रतिभा वाकडे, रेखाबाई घोडमारे, पर्वता वाकडे, मंगला नीलेकर उपस्थित होते