राजकीय

गडचिरोली नगरपालिकेसाठी युतीने जोरदार कंबर कसली, विजयाचा गुलाल उधळण्याचा निर्धार !  – नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- स्थानिक नगरपालिका निवडणूकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. विजयासाठी सर्वांनी जोर लावला आहे. माजी बांधकाम सभापती प्रा.राजेश कात्रटवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजीत पवार गट) आणि शिवसेना( शिंदे गट ) युतीने विजयासाठी चांगलीच कंबर कसली असून प्रत्येक नगराध्यक्ष उमेदवारासह प्रत्येक वार्डात तगडे उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे भाजपा समोर तगडे आव्हान उभे ठाकले आहे.

राज्यात महायुतीचे सरकार असले तरी गडचिरोली नगरपालिकेत भाजपाने एकला चलो रे चा नारा देत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र महायुती मधील घटक पक्ष असलेल्या अजीत पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकत्र येऊन गडचिरोली नगपालिकेच्या निवडणुकीत एकत्र येत भाजपा समोर तगडे आव्हान उभे केले आहे. युतीची समस्त धुरा माजी बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार यांच्या हातात आहे. त्यांनी निवडणूकीसाठी कोणतीही कसर सोडली नसून प्रत्येक वार्डात तगडे उमेदवार उभे करून भाजपा व कॉंग्रेसला चांगलाच घाम फोडला आहे. गडचिरोली नगरपालिकेची निवडणूकीत तिरंगी लढतीचे चित्र निर्माण करण्यात आले असले तरी खरी लढत युती आणि भाजपा मध्ये होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

युतीकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून आश्विनी रविंद्र नैताम, भाजपाकडून प्रणोती सागर निंबोरकर, तर कॉंग्रेसकडून कविता सुरेश पोरेड्डीवार , शरद पवार यांच्या राष्टवादी कॉंग्रेसकडून बिपाशा नागनाथ भुसारे, अपक्ष उमेदवार वनिता बांबोळे या प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.