राजकीय

गडचिरोली शहरात विकासाची गंगा पोहचविणार — प्रणोती सागर निंबोरकरांचा संकल्प

AVB NEWS गडचिरोली :-  शहराचा मूलभूत विकास आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजांना प्रतिसाद देण्यासाठी व्यापक दृष्टीकोन आवश्यक असल्याचे सांगत, भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर उभ्या असलेल्या प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांनी आपला सर्वसमावेशक विकास आराखडा जाहीर केला आहे. शहरातील प्रत्येक गल्लीपर्यंत विकासाची गंगा पोहचवण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी गडचिरोलीसाठी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले—

मजबूत व सुगम रस्तेव्यवस्था

सांडपाण्याचे प्रभावी व्यवस्थापन

स्वच्छता व पर्यावरण सुधारणा

सतत आणि शुद्ध पाणीपुरवठा

आधुनिक स्ट्रीट लाईटिंग

आरोग्य व सुरक्षिततेसाठी सुधारित सुविधा

तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम

महिलांसाठी सुरक्षित व सुलभ शहरी व्यवस्था

प्रणोती निंबोरकर यांनी नागरिकांच्या प्रत्यक्ष सहभागास अत्यंत महत्त्व देत पारदर्शक व जवाबदार प्रशासनाचे ध्येय समोर ठेवले. शहरातील समस्यांचा जवळून अभ्यास करून तयार केलेल्या योजनांना नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.