गडचिरोली शहराच्या पुढील पाच वर्षाच्या विकासाचे ‘माॅडेल’ तयार ! – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन, भाजपाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन – काॅंग्रेसचे अतुल मल्लेलवार यांचा भाजपात प्रवेश

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- विकासाचा जाहीरनामा केवळ भाजपाच देऊ शकते. ज्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी देश व राज्याच्या विकासाचे ‘माॅडेल’ तयार केले आहे. त्याप्रमाणे गडचिरोली शहराच्या पुढील पाच वर्षात करण्यात येणाऱ्या विकासाचे ‘माॅडेल’ तयार करण्यात आले आहे. त्यानुसार येत्या ५ वर्षात गडचिरोली शहराचा सर्वांगीण विकास केला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडचिरोली येथील कार्यक्रमात केले.त्यांनी काॅंग्रेसवर निशाना साधत देशात व राज्यात काॅंग्रेसची अवस्था वाईट असल्याची टीका केली
ना. बावनकुळे यांच्या हस्ते आज शनिवार नगर परिषद निवडणूकीसाठी सुरू करण्यात आलेल्या भाजपाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले . यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी खा. अशोक नेते, निवडणूक जिल्हा प्रभारी आ. बंटी भांगडीया, आ. मिलींद नरोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी आ. डाॅ. नामदेव उसेंडी, माजी आ. डाॅ. देवराव होळी, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणौती निंबोरकर, माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, जेष्ठ नेते, बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक पदाचे उमेदवार, भाजपा कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
ना. बावनकुळे पुढे म्हणाले की, गडचिरोली शहराचा विकास केवळ भाजपाच करू शकते. गडचिरोली शहरातील अतिक्रमणधारकांना पट्टे देण्याची कार्यवाही सर्वप्रथम केली जाईल. जी घरे 15 आॅक्टोबर 2024 पुर्वीची आहेत नियमाकुल करून त्यांना प्रापर्टी कार्ड व सातबारा दिला जाईल. तसेच झुडपी जंगलातील सुध्दा पट्टे वाटप केले जाणार आहेत. तसेच शहराचा सिटी सव्र्हे केला जाणार असून सव्र्हेचा खर्च शासन उचलणार असल्याचेही ना. बावनकुळे म्हणाले. कार्यक्रमाप्रसंगी काॅंग्रेसचे अतुल मल्लेलवार यांनी आपल्या काही कार्यकत्र्यांसह भाजपात प्रवेश केला. ना. बावनकुळे यांच्या हस्ते त्यांचे प्रक्षात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी माजी खा. अशोक नेते, आ. बंटी भांगडिया, आ. डाॅ. मिलींद नरोटे, जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी नगर परिषद निवडणूकीत भाजपाचा विजय निश्चित होईल, असा आशावाद व्यक्त केला.