जनसेवेसाठी स्व:ताला वाहून घेतलेले व्यक्तीमत्व म्हणजे अरविंद कात्रटवार ! – सामाजिक कार्यकर्ते यादव पाटील लोहंबरे यांचे प्रतिपादन – अरविंद कात्रटवार मित्र परिवारांच्या वतीने भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्य माता भगीनींना वस्त्रभेट

AVB NEWS गडचिरोली :- अरविंद कात्रटवार हे जनसेवेसाठी स्वताला वाहून घेतलेले व्यक्तीमत्व आहे. गेल्या अनेक वर्षापासून अरविंदकात्रटवार यांची मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या विकासासाठी त्यांची सतत धडपड सुरू आहे. त्यांनी या भागातील अनेक विकासात्मक समस्याच नव्हे तर गोरगरीब जनतेची कामे मार्गी लावून न्याय मिळवून दिला आहे. या जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक घटकातील महिला नागरिकांचा विकास घडून आला पाहीजे, यासाठी ते कटीबध्द असून आदिवासी समाजबांधव माता भगीनींनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते यादव पाटील लोहंबरे यांनी केले.
अरविंद कात्रटवार मित्र परिवाराच्या वतीने मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील मौशीखांब, मरेगाव व कळमटोला येथे भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्य माता भगीनींसाठी वस्त्रभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी माता भगीनींना संबोधीत करतांना ते बोलत होते. वस्त्रभेट कार्यक्रमाप्रसंगी माता भगीनींनी कृतघ्नता व्यक्त केली. यादवजी पाटील लोहंबरे पुढे म्हणाले की, सर्वधर्मसमभाव हे ब्रिद जोपासून अरविंद कात्रटवार यांचे मौशीखांब- मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील गावागावांमध्ये सेवा कार्य सुरू आहे.समाजातील प्रत्येक घटकांचा विकास झाला तरच संपुर्ण गावाचा विकास घडून येईल ही त्यांची भावना आहे. गेल्या अनेक वर्षापासून अविरत विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांची सामाजिक वाटचाल सुरू आहे त्यांनी या भागातील रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, शेतकरी, शेतमजूर आणि विद्याथ्र्यांच्या समस्या सोडविल्या आहेत. सेवाभाव जोपासून केलेल्या कार्यामुळे अरविंदकात्रटवार हे खरेखुरे लोकनेते ठरले असून जिल्हा परिषद निवडणूकीत त्यांना मौशीखांब – मुरमाडी भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून विजयी करावे, असे आवाहन यादव पाटील लोहंबरे यांनी केले.
या प्रसंगी यादवजी पाटील लोहंबरे, प्रशांत ठाकूर, गोपाल मोंगरकर, यादव चौधरी, जीवन कुरुडकर, विनोद चापळे, स्वप्नील जुमनाके, अमित चौधरी,सुरेश कोलते, दिलीप वलादे, देवेंद्र मुळे, दीपक लाडे, विकास उंदीरवाडे, पुरुषोत्तम सुर्यवंशी व गावकरी उपस्थित होते