जिल्हा
कॉंग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शन करून नामांकन केले दाखल – नगराध्यक्षपदासाठी कविता पोरेड्डीवार यांना उमेदवारी

एव्हीबी न्यूज गडचिरोली :- गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षातर्फे भव्य शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या भव्य रॅलीत काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार. कविता सुरेश पोरेड्डीवार यांनी, पक्षाच्या सर्व नगरसेवक उमेदवारांसह, मोठ्या जल्लोषात व शिस्तबद्ध पद्धतीने आपले नामांकन अर्ज दाखल केले.
शहरातील जिल्हा काँग्रेस कार्यालयातून निघालेल्या या रॅलीत हजारो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि मोठ्या जनसमर्थनासह झालेल्या या शक्तीप्रदर्शनामुळे संपूर्ण शहराचा परिसर दुमदुमून गेला.