जोरदार शक्तीप्रदर्शन करून राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिंदेसेना युतीच्या उमेदवारांचे नामांकन दाखल- गडचिरोली नगर पालिक निवडणूकीत अरविंद कात्रटवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसला (अजीत पवार गट) पाठींबा

गडचिरोली :-
गडचिरोली नगरपालिका निवडणूकीत अजीत पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती झाली आहे. युतीच्या वतीने आज सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत रॅली काढून दाखल करण्यात आले. रॅलीमध्ये हजारो नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
अरविंद कात्रटवार यांनी गडचिरोली नगरपालिकेच्या निवडणूकीत अजीत पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठींबा दिला असून उमेदवारांच्या रॅली मध्ये अरविंद कात्रटवार यांच्यासह त्यांचे शेकडो समर्थक सहभागी झाले होते.
नामांकन दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीची सुरवात आठवडी बाजारातील हनुमान वार्डातून करण्यात आली. या रॅलीत युतीचे नेतृत्व करीत असलेले माजी बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, अरविंद कात्रटवार, शिंदेसेनेचे हेमंत जंबेवार, यांच्यासह उमेदवार, कार्यकर्ते व हजारो नागरिक सहभागी झाले होते. ढोलताशाच्या गजरात रॅली काढण्यात आली. जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. युतीच्या वतीने नगराध्यक्षपदाची उमेदवारी आश्विनी नैताम यांना तर नगरसेवक पदासाठी २६ जणांना उमेदवारी देण्यात आली