आदिवासी समाजबांधवांनी भगवान बिरसा मुंडांचा आदर्श जोपासून वाटचाल करावी..! – अरविंद कात्रटवार यांचे प्रतिपादन, – मौशीखांब – मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात गुंजला ‘जय सेवा’ चा गजर , भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात…

AVB NEWS गडचिरोली :- आदिवासी समाजाचे दैवत भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मौशीखांब मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात उत्साहात साजरी करण्यात आली. मौशीखांब, मरेगाव, कळमटोला आदी गावागावांमध्ये‘जय सेवा’ गजर’ चा गुंजला. जयंती समारोहामुळे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भगवान बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमाला अरविंद कात्रटवार यांनी उपस्थिती दर्शवून आदिवासी समाज बांधवांचा आंनद व्दिगुणीत केला.
आदिवासी समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना अरविंद कात्रटवार म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा यांचे भारतीय स्वातंत्र्य लढण्यात महत्वपुर्ण योगदान आहे. त्यांनी आदिवासी समाजाला संघटीत करून ब्रिटीश सत्तेविरूध्द मोठा लढा दिला. आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी संघर्श केला. त्यांनी आदिवासी समाजात धर्म आणि सामाजिक सुधारणांना प्रोत्साहन दिले. बिरसा मुंडा यांच्या कार्यामुळेच आदिवासींच्या जमिनींच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी कायदे करण्यास त्याकाळी ब्रिटीश शासनाला भाग पाडले. आदिवासी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे व हक्कासाठी ब्रिटीशांविरोधात आंदोलन उभारणारे भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य प्रेरणादायी असून आदिवासी समाज बांधवांनी त्यांचा आदर्श जोपासून वाटचाल करावी, असे प्रतिपादन अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.
अरविंद कात्रटवार पुढे म्हणाले की,वनव्याप्त गडचिरोली जिल्हयातील आदिवासी समाज हा अद्यापही विकासापासून वंचीत आहे. शासनाच्या अनेक योजना आदिवासी बांधवांपर्यत पोहचलेल्या नाहीत. मौशीखांब -मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील आदिवासी समाजबांधवांचा सर्वांगीण विकास झाला पाहीजे. त्यांना त्यांचे हक्क आधिकार मिळाले पाहिजे. एक जनसेवक म्हणून मी आदिवासी समाजबांधवाच्या पाठीशी आहे. आदिवासी समाजबाधवांच्या कोणत्याही समस्या असल्यास त्या सोडविण्यासाठी आणि अधिकार, हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कटीबध्द असल्याची ग्वाही अरविंद कात्रटवार यांनी दिली.
कार्यक्रमाला आदिवासी समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.